JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Milind Gawali : 'माझी आई आता मला...'; नवरात्रीनिमित्त मिलिंद गवळींनी शेअर केली आईची 'ती' आठवण

Milind Gawali : 'माझी आई आता मला...'; नवरात्रीनिमित्त मिलिंद गवळींनी शेअर केली आईची 'ती' आठवण

अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. आज त्यांनी नवरात्रोत्सवानिमित्त त्यांच्या जुन्या चित्रपटातील एक खास गाणं चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. या गाण्यामागच्या खास आठवणी देखील त्यांनी सांगितल्या आहेत.

जाहिरात

Milind gawali

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  26 सप्टेंबर:  आज नवरात्रोत्सवाची दणक्यात सुरुवात झाली आहे. पुढचे नऊ दिवस सगळीकडे धामधूम असेल. मराठी कलाकारसुद्धा नवरात्रोत्सव साजरा करत आहेत. अभिनेते मिलिंग गवळींनी नवरात्राच्या  हटके शुभेच्छा चाहत्यांना दिल्या आहेत.   छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. ते मालिकेतील सहकलाकारांबद्दल तसेच विविध किस्से, अनुभव नेहमीच शेअर करत असतात. आजही त्यांनी नवरात्रोत्सवानिमित्त  त्यांच्या जुन्या चित्रपटातील एक खास गाणं  चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. या गाण्यामागच्या खास आठवणी देखील त्यांनी सांगितल्या आहेत. मिलिंग गवळींनी त्यांच्या  “भक्ती हीच खरी शक्ती” चित्रपटातील एक गाणं  शेअर केलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे यात प्रेक्षकांना अष्टलक्ष्मींच चित्रीकरण केलेलं आहे. या चित्रपटात मिलिंद गवळींसोबत अलका कुबल आणि दीप्ती केतकर देखील आहेत. या चित्रपटाचं गाणं  शेअर करत त्यांनी या गाण्याविषयी फार सुंदर दृष्टिकोन मांडला आहे. त्यांनी म्हटलंय कि, ‘‘आमच्या “भक्ती हीच खरी शक्ती” या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना अष्टलक्ष्मींच मिळालं होतं,कोल्हापूरची महालक्ष्मी , तुळजापूरची आईभवानी, कारल्याची एकवीरा देवी, मुंबईची महालक्ष्मी, गोव्याची शांतादुर्गा, वणीची आई सप्तशृंगी, माहूरची रेणुकामाता, आंबेजोगाई ची योगेश्वरी माता. महाराष्ट्र मध्ये बऱ्याचशा शेतात राबणाऱ्या ,मजुरी करणाऱ्या ,कष्ट करणाऱ्या बायकांना या सगळ्या देवींचे दर्शन घडणं फार कठीण असतं, दहा वीस वर्षातनं एकदा कधीतरी कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा तुळजाभवानी किंवा वणीची देवी, अगदी नशिबात असेल तरच दर्शन घडतं.’’

संबंधित बातम्या

पुढे त्यांनी लिहिलंय कि, ‘‘पूर्वी हे सिनेमा माध्यम फार सुंदर होतं, या सिनेमा माध्यमातून त्या सगळ्या बायकांना , या सगळ्या देवस्थानचे दर्शन घडायचं, या उद्देशाने प्रज्वल शेट्टी आणि विजय शेट्टी त्यांनी हा चित्रपट बनवला, एवड सगळं युनिट घेऊन या सगळ्या देवस्थानांना जाऊन शूटिंग करणं फारच कठीण होतं, बऱ्याचशा देवस्थानात शूटिंग करायची परमिशनच नव्हती, एकवीरा देवी मंदिराच्या गडावर पोहोचल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही दिल्लीवरून परमिशन घेऊन या.’’ हेही वाचा - Navratri 2022 Wishes: दुर्गामातेच्या भक्तीत व्हा तल्लीन, नवरात्रौत्सवानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा शुभेच्छापर संदेश ‘‘शांतादुर्गा मंदिरात आत प्रवेशच करायला परवानगी मिळाली नव्हती, निर्माते विजय शेट्टी यांना अशक्य असं काहीच नसतं, त्यांनी हे सगळं शक्य करून दाखवलं आणि आमचं भाग्य की आम्हाला सगळ्या देवींच्या मंदिरात शूटिंग करायला मिळालं आणि हा चित्रपट, ग्रामीण माय माऊली प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आणि अतिशय छान चालला ही.’’

मिलिंद गवळीने या गाण्याद्वारे स्त्रीशक्तीला प्रणाम केला आहे.  त्यांनी हे गाणं  आणि त्यांची हि पोस्ट ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी शेअर केली आहे. त्यांनी म्हटलंय कि, ‘‘हे जे गाणं आहे ते 19 मिनिटांचं गाणं आहे, आत्ताच्या प्रेक्षकांकडे तेवढे Patience नाही आहेत, कल्पना आहे त्याची’’ ‘‘पण माझी ही पोस्ट , त्या एका मायमाऊलीसाठी आहे, जिल्हा नवरात्रीच्या दिवशी सगळ्या देवीचे दर्शन घ्यायचं असतं, आता माझी खरी माय नाहीये, माझी आई जी नवरात्रीच्या नऊ दिवशी महालक्ष्मी मंदिरात दररोज जायची, मधुमेह असून नऊ दिवस उपवास करायची, आता या सगळ्या देवींच्या रूपात मला ती दिसते. म्हणून ज्या माऊलींना असं दर्शन घेणं कठीण जातं त्यांच्यासाठी हे गाणं “भक्ती हीच खरी शक्ती” मधलं…..’’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या