JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या पुण्याची कमाई! यश प्रकरणात देशमुखांना मिळणार शेजाऱ्यांची खंबीर साथ

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या पुण्याची कमाई! यश प्रकरणात देशमुखांना मिळणार शेजाऱ्यांची खंबीर साथ

अरुंधतीच्या मागे एकामागून एक संकटाचा फेरा काही सुटत नाहीये. मात्र तिच्या प्रत्येक संटकात तिच्या माणसांनी तिला खंबीर साथ दिली आहे. यावेळी अरुंधतीसाठी तिचे शेजारीही धावून येणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जुलै: स्टार प्रवाहवरील ( Star Pravah) आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) मालिकेत सध्या देशमुख कुटुंबावर नवं संकट आलं आहे.  यशवर नीलच्या खुनाचा आरोप आल्यानं त्याला जेलमध्ये जाव लागलं आहे. यश निर्दोश असल्याचं संपूर्ण देशमुखांना माहिती आहे त्यामुळे अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. यशची केस आशुतोषची आई भक्कमपणे लढवणार आहे. अरुंधतीच्या मागे एकामागून एक संकटाचा फेरा काही सुटत नाहीये. मात्र तिच्या प्रत्येक संटकात तिच्या माणसांनी तिला खंबीर साथ दिली आहे.  यशच्या बाबातीत घडलेल्या घटनेमुळे केवळ देशमुख कुटुंबच नाही तर शेजाऱ्यांनाही त्रास झाला आहे.  यासगळ्यात देशमुखांचे शेजारी यशसाठी धावून येणार आहेत. देशमुखांच्या वाईट काळात त्यांना शेजाऱ्यांची खंबीर साथ मिळणार आहे. मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात शेजारी देशमुखांच्या घरी येऊन आम्ही तुमच्या आणि यशच्या मागे खंबीरपणे उभे आहोत असं सांगतात.  हे ऐकून अरुंधती आणि संपूर्ण देशमुखांना मोठा दिलासा मिळतो.  प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्या प्रमाणे, शेजारी म्हणतात, ‘आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे आहोत काही लागलं तर कळवा. यश चांगला मुलगा आहे. जाता येताना भेटतो. कायम मदत करतो. कधी हातातली पिशवी घेते. जाताना कधी वाटेत भेटला तर स्कूटरवरुन घरापर्यंत आणून सोडतो.  प्रत्येकाच्या आयुष्यात  चढ उतार येत असतात. पण यशपासून समाजाला काही धोका आहे असं काहीच नाही. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा नाही.  तो गुन्हेगारांना अद्दल घडवणारा मुलगा आहे’, हे ऐकून सर्वांचेच डोळे पाणवतात.

संबंधित बातम्या

हेही वाचा - Timepass 3: Lovable हृता दुर्गुळेच्या कोळी लुकवर चाहते फिदा; गाणं येण्याअगोदर टीजरवरच लाइक्सचा पाऊस शेजाऱ्यांचा पाठींबा पाहून देशमुखांना नवं बळ  मिळतं. तेवढ्यात शेजारच्या काकू, ‘अरुंधती तुझे संस्कार आम्ही बघितले आहेत. तुझ्या तिन्ही मुलांना तु डोळ्यात तेल घालून वाढवलं आहेस. तु काहीही काळजी करु नकोस आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. हे ऐकून अरुंधतीला रडू आवरत नाही. अरुंधतीनं इतके वर्ष केलेल्या चांगल्या कामाचं फळ आता तिला मिळणार आहे.  त्यामुळे मालिकेच्या येत्या भागात काय घडणार हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या