आई कुठे काय करते
मुंबई, 18 जुलै : आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धची भुमिका पूर्णपणे बदलून टाकली आहे. आधी फेकस, प्रोफेशनल वाटणारा अनिरुद्ध आता कटकारस्थानं करू लागला आहे. मालिकेतील अनिरुद्ध आता सगळ्यांच्या विरोधात जाऊन स्वत:ला खलनायक करून घेताना दिसतोय. मालिकेत अनिरुद्धचं खरं रुप समोर आल्यानंतर आता तर अनिरुद्ध उघडपणे कटकारस्थानं करताना दिसणार आहे. इतके दिवस अरुंधतीला त्रास देण्यासाठी तो वीणाचा वापर करत होता मात्र आता आपल्या मुलीचं भविष्य वेठीस धरून अनिरुद्ध नवी खेळी खेळताना दिसणार आहे. पण यामुळे अनिरुद्धचं एकटा पडणार आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. काय घडणार येणाऱ्या भागात पाहूयात. मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की, अनिरुद्धचं खरं रुप सगळ्यांसमोर येतं. अरुंधती अनिरुद्धच्या कानाखाली मारते. देशमुखांच्या घरात नको तितका ड्रामा होता. अनिरुद्धचा सर्वांसमोर अपमान होतो. झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अनिरुद्ध आपल्या मुलीचा वापर करतो. मागील भागात आपण पाहिलं की, अनिरुद्ध इशा आणि अनिश यांचं लग्न मोडतो. मी त्यांचं लग्न होऊ देणार नाही असं तो सगळ्यांना सांगतो. हेही वाचा - Ketaki Chitale : खाताही येईना अन् बोलताही येईना; दीप अमावस्येच्या रात्री अशी झाली केतकीची अवस्था अनिरुद्धच्या या निर्णयानंतर इशा, अनिश आणि दोन्ही कुटुंब चिंतेत येतात. पण अनिरुद्ध बदल घेण्यासाठी हे सगळं करत आहे हे अरुंधतीला चांगलंच माहिती असतं. अनिरुद्ध इशा आणि अनिश यांचा संपर्क होणार नाही याची पूर्ण व्यवस्था करतो. दोघेही घाबरून जातात. इशा आत्महत्येचा प्रयत्न करते. तितक्यात अरुंधती तिथे येते. मालिकेच्या प्रोमो समोर आला आहे. ज्यात अनिश अत्यंत भावुक होऊन देशमुखांकडे अनिरुद्धची माफी मागायला जातो. तेवढ्यात आषुतोष त्याला थांबवतो. “तु अनिरुद्धची माफी मागणार हे आम्हाला मान्य नाही. अनिरुद्ध सारख्या माणसाकडून आतापर्यंत झालेला अपमान पुरे झाला”, असं वीणा अनिशला खडवासून सांगते.
इकडे देशमुखांच्या घरी लग्न मोडत असल्याने इशा घर डोक्यावर घेते. इशाला समजावण्यासाठी अरुंधती देशमुखांकडे येते. घरात अनिरुद्धचा ड्रामा सुरू असतो. अरुंधती “तुमचा राग माझ्यावर आहे. माझा अपमान करायचाय, माझ्यावर सुड उगवण्याचे अनेक प्रसंग येतील आयुष्यात. पण याची मुलांना शिक्षा का?” असा प्रश्न अनिरुद्धला विचारते. तर अरुंधतीची बाजू घेऊन कांचन देखील अनिरुद्धला खडसावते. “मी गुरूजींना इशा आणि अनिषच्या लग्नाची तारीख काढायला सांगितली आहे”, असं कांचन डरडावून अनिरुद्धला सांगते. तरीही अनिरुद्ध, “या लग्नाला माझी हरकत आहे” असं सांगतो. अनिरुद्धच्या या वाक्यावर संजना त्याला, “तुला हवं तसं तू वाग, आम्हाला हवं तसं आम्ही वागू”, असं म्हणत खडसावते. संजना त्याला खुल चॅलेंजच देते.
संपूर्ण देशमुख कुटुंब आता एकत्र आलं आहे. त्यामुळे अनिरुद्ध एकटा पडला आहे. वीणाबरोबर खोटं वागून त्यानं तिचा देखील विश्वास गमावला आहे. त्यामुळे आता इशा आणि अनिश यांचं लग्न होणार हे निश्चित. पण यात अनिरुद्ध काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.