JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता करणवीर बोहरावर गुन्हा दाखल, महिलेकडून गंभीर आरोप

अभिनेता करणवीर बोहरावर गुन्हा दाखल, महिलेकडून गंभीर आरोप

छोट्या पडयावरील प्रसिद्ध चेहरा (Tv Actors) म्हणून अभिनेता करणवीर बोहराला (Karanvir Bohra) ओळखलं जातं. मात्र या अभिनेत्याबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जून- छोट्या पडयावरील प्रसिद्ध चेहरा   (Tv Actors)  म्हणून अभिनेता करणवीर बोहराला (Karanvir Bohra) ओळखलं जातं. मात्र या अभिनेत्याबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एका 40  वर्षीय महिलेने करण आणि त्याची पत्नी तजविंदर सिद्धू अर्थातच टीजेवर  (TJ) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. ANI च्या रिपोर्टनुसार, एका 40 वर्षीय महिलेने आरोप केला आहे की, 2.5 % व्याजावर पैसे परत करण्याच्या आश्वासणार आपली फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात या महिलेने करणवीर बोहरासह तब्बल सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. महिलेने आपल्या जबाबात असा दावा केला आहे की, या सेलिब्रेटी जोडप्याने केवळ 1 कोटी रुपयांपेक्षा थोडी जास्त रक्कम परत केली आहे. ओशिवारा पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

शिवाय त्या महिलेने असा आरोप केला आहे की, ‘आपण जेव्हा करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी तजविंदर सिद्धू यांच्याकडे उर्वरित रकमेची मागणी केली तेव्हा या जोडप्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही. उलट आपल्याला गोळ्या घालण्याची धमकी दिली. याबाबत ओशिवरा पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. (हे वाचा :‘महाभारत’ फेम अभिनेत्याचा कार अपघात, विचित्र घटनेतून थोडक्यात बचावला ) करणवीर बोहरा हा हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो नुकतंच कंगना रणौतने होस्ट केलेल्या ‘लॉक अप’ या रिऍलिटी शोमध्ये दिसला होता. याशिवाय त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. कुबल है, सौभाग्यवती अशा अनेक टीव्ही मालिका आणि रिऍलिटी शोचा यामध्ये समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या