JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 72 Hoorain: जेएनयू मध्ये होणार '72 हूरें'चं स्पेशल स्क्रीनिंग; निर्माते म्हणाले '...तरच दहशतवादाचं सत्य समजेल'

72 Hoorain: जेएनयू मध्ये होणार '72 हूरें'चं स्पेशल स्क्रीनिंग; निर्माते म्हणाले '...तरच दहशतवादाचं सत्य समजेल'

सिनेमाचा पहिला टीझर 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हापासून चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.

जाहिरात

72 हूरें

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जुलै : मागच्या काही दिवसात सगळीकडेच एका चित्रपटाची चर्चा होती ती म्हणजे ‘द केरला स्टोरी’. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली तरी त्यामुळे तेवढाच वाद देखील निर्माण झाला. आता ‘द केरला स्टोरी’ सारखाच अजून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘72 हूरें’ असं या चित्रपटाचं नाव असून तो लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संजय पूरन सिंह चौहान यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आतंकवादावर भाष्य करणारा आहे.  सिनेमाचा पहिला टीझर 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हापासून चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. 72 हूरें या सिनेमाचा टीझर समोर येताच वादंग निर्माण झाला. दहशतवादावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाला अनेक जण विरोध करताना दिसून आले. या  टीझरमध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, याकूब मेमन, मसूद अझहर, हाफिद सईद आणि सादिक सईद यांच्यासारख्या दहशतवाद्यांचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळत आहे. आता  या सर्व वादांमध्ये, चित्रपटाच्या निर्मात्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच ‘जेएनयू’च्या  कॅम्पसमध्ये ‘72 हुरें’ या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग करणार असल्याची घोषणा केली आहे.

जेएनयू युनिव्हर्सिटीत अनेक वास्तविक जीवनावर आधारित बॉलिवूड चित्रपटांना नेहमीच विरोध होतो. ‘द काश्मीर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ या सारख्या चित्रपटांना  जेएनयू च्या विद्यार्थ्यांकडून तुफान विरोध केला गेला. त्याविरुद्ध निदर्शनं देखील झाली. अशा परिस्थितीत कॅम्पसमध्ये ‘72 हुरें’च्या स्पेशल स्क्रीनिंग ठेवल्याने नवा वाद निर्माण होऊ शकतो. असे असूनही हा चित्रपट 4 जुलै रोजी जेएनयू कॅम्पसमध्ये दाखवला जाणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. फक्त एक चूक अन् उद्ध्वस्त झालं या अभिनेत्यांचं करिअर! एका चुकीमुळं मोडलं सुपरस्टार होण्याचं स्वप्न जेएनयूमध्ये ‘72 हुरें’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगबाबत निर्माते म्हणाले की, चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ही काश्मिरी मुस्लिम आणि इतर विद्यार्थ्यांसाठी चित्रपटात दाखविलेल्या दहशतवादी घटनांच्या सत्याबाबत व्यक्त होण्याची सुवर्णसंधी आहे. चांगली संधी मिळेल. ते म्हणाले की, या चित्रपटाच्या माध्यमातून  दहशतवादासारख्या गंभीर विषयावर संवाद होईल.  हे प्रकरण गंभीरपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’ असं निर्माते म्हणाले आहेत. ‘72 हुरें’  हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पुरण सिंग चौहान यांनी केले आहे. गुलाबसिंग तंवर, किरण डागर, अनिरुद्ध तन्वर यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली असून अशोक पंडित चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या