राहुल पाटील, पालघर 29 सप्टेंबर : बोईसर परिसर एका तरुणाने तरुणीवर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . गोळीबाराची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केल्याचं तपासात उघड झालं असून बोईसरमधील टिमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा डोक्याला गोळी लागल्याने मृत्यू झाला. गोळीबार करुन पळून जाण्याचा तयारीत असलेल्या कृष्णा यादव या आरोपीचा स्थानिकांनी पाठलाग केला. मात्र आरोपीने सीआयएसएफच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला. सीआयएसएफच्या गाडीखाली आल्याने जखमी झालेल्या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला . पालघरमध्ये भरदिवसा तरुणीवर गोळीबार, टिमा हॉस्पिटलजवळ भयानक रक्तपात बोईसर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान आरोपी आणि मयत मुलगी यांचं प्रेम प्रकरण होतं. मयत मुलीच्या कुटुंबीयांकडून लग्न करण्याच्या आग्रहानंतरही तरुण लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती मयत मुलीच्या आईकडून देण्यात आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेत पाहायला मिळतं, की हा तरुण तरुणीचा पाठलाग करत आहे. इतक्यात रस्त्यावरच तो या तरुणीवर गोळीबार करतो. हे पाहून आसपासचे लोकही घाबरून तिथून पळ काढतात. पुणे : शाळेच्या आवारातच थरारक घटना; दहावीतील मुलाचा विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा केला. भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. कृष्णा यादव असं या घटनेतील आरोपीचं नाव होतं. पोलिसांनी त्याच्याजवळ सापडलेली रिव्हॉल्वर जप्त केली आहे.