JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / अल्पवयीन मुलांबरोबर जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवणाऱ्या अधिकारी महिलेची तुरुंगात रवानगी

अल्पवयीन मुलांबरोबर जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवणाऱ्या अधिकारी महिलेची तुरुंगात रवानगी

ब्रिटनमध्ये (Britain) अशीच एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका महिला कस्टडी अधिकाऱ्यानं (Female Custody Officer) एका 15 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 23 जून: लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Abuse) घटना अलीकडच्या काळात सातत्यानं समोर येत आहेत. दिवसेंदिवस ही विकृती वाढत असून अगदी लहान वयातील मुलं याला बळी पडत आहेत. अनेकदा जवळचे नातेवाईक, शिक्षक, संस्थेतील अधिकारी मुलांवर असे अत्याचार करत असल्याचं आढळलं आहे. नुकतीच ब्रिटनमध्ये (Britain) अशीच एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका महिला कस्टडी अधिकाऱ्यानं (Female Custody Officer) एका 15 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या महिला अधिकाऱ्याकडं काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आलेल्या या मुलाबरोबर तिनं शारीरिक संबंध ठेवले. तसंच त्याला ती आक्षेपार्ह संदेशही पाठवत असल्याचं सिद्ध झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं या महिलेला दोषी ठरवलं आहे. तसंच  तिला दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून, तिचं नाव दहा वर्षांसाठी लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या यादीत नमूद करावं असा आदेशही दिला आहे. झीन्यूज इंडिया डॉट कॉमनं याबाबतचे वृत्त दिलं आहे. लेसेस्टरशायर येथे राहणाऱ्या 26 वर्षीय कस्टडी ऑफिसर अॅशले राईट (Ashley Wright) हिनं डिसेंबर 2018 ते जून 2019 दरम्यान त्या मुलावर अत्याचार केल्याचं आढळलं आहे. ‘दी सन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पीडित मुलाला मिल्टन केन्स सिक्योर ट्रेनिंग फॅसिलिटी येथं पाठवण्यात आलं होतं. तिथं कस्टडी ऑफिसर म्हणून अॅशले राईट काम करत होती. त्यावेळी तिनं या मुलाशी बळजबरीनं शारीरिक संबंध (Physical Relations) ठेवले. हेही वाचा-  लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहित जोडप्यानं उचललं धक्कादायक पाऊल या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना तिनं त्या मुलाला पाठवलेले अनेक आक्षेपार्ह संदेश तसंच अश्लील फोटो आढळले. अॅशलेच्या घराची झडती दरम्यान तिच्या बेडरूममध्ये तसंच मोबाइलमध्ये तिचे त्या मुलाबरोबरचे फोटो पोलिसांना सापडल्याचं क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या प्रवक्त्याने सांगितलं. अॅशलेनं त्या मुलाला, मी तुझ्याबरोबर झोपण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. ‘बेब, तू त्या फोटोमध्ये सेक्सी दिसत आहेस’,अशा प्रकारचे संदेश पाठवल्याचंही आढळलं आहे. याआधीही ती 13 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांबरोबर लैंगिक अत्याचार करण्यासाठी दोषी ठरवण्यात आलं होतं. एका कर्मचार्‍यानं एका लहान मुलाबरोबर आक्षेपार्ह कृत्य करताना पाहिल्यानं तिचे हे कारनामे उघडकीस आले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान किंग्स्टन क्राउन कोर्टानं अॅशलेवरील आरोप गंभीर असल्यानं तिला त्यासाठी शिक्षा मिळालीच पाहिजे,असं स्पष्ट करत तिला दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या