चेन्नई(दीप राज दीपक), 05 एप्रिल : तामिळनाडूतून एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. एका 39 वर्षीय महिलेने जुन्या प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या महिलेला हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हत्या झालेला व्यक्ती मागच्या एक महिन्यांपासून गायब होता. यावेळी पोलिसांनी तपासात हा यावक्तीच्या आरोपींना शोधण्यात यश आलं आहे.
प्रेयसीने तिच्या मैत्रिणींसोबत जुन्या प्रियकराच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि चेन्नईच्या बाहेर असणाऱ्या कोवलम येथे वाळूत पुरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सेक्स वर्कर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव एम जयंतन असे आहे. हा व्यक्ती चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील खाजगी विमान कंपनीचा स्टाफ मेंबर आहे. तो त्याच्या बहिणीच्या कुटुंबासोबत चेन्नईतील नांगनाल्लूर येथे राहत होता.
18 मार्चपासून तिचा भाऊ बेपत्ता असून त्याचा मोबाइल बंद असल्याची तक्रार जयंतनच्या बहिणीकडून पझवानथंगल पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी 20 मार्च रोजी एफआयआर नोंदवून त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी सांगितले की कॉल रेकॉर्डिंग आणि इतर पुराव्याच्या आधारे जयंतन भाग्यलक्ष्मीला भेटण्यासाठी पुदुक्कोट्टाई येथे गेला होता.
भाग्यलक्ष्मी आणि जयंतन यांच्या प्रेमसंबंध होते परंतु काही काळानंतर त्यांच्यात वितुष्ठ आलं. दरम्यान त्यांनी भाग्यलक्ष्मीवर संशय घेत कसून चौकशी करताच तिने हत्या केल्याचे कबुल केले. वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाने सेक्स वर्कर असलेल्या या महिलेने काही महिन्यांपूर्वी लग्न केले परंतु ते अचानक वेगळे झाले होते.
18 मार्च रोजी जयंतन भाग्यलक्ष्मीला भेटण्यासाठी पुदुक्कोट्टई येथे गेला होता. तेथे महिलेने दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने त्याची हत्या केली. त्यानंतर तिने मृतदेहांचे तुकडे केले आणि प्लास्टिकच्या पिशवीत पॅक केले आणि कापलेले तुकडे कोवलम येथे आणले आणि तेथे तिने मृतदेहाचे तुकडे वाळूत पुरल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान अधिकतपास पुदुकोट्टाई पोलीस करत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यलक्ष्मी ही सेक्स वर्कसाठी चेन्नईला जात असे, तिथे कोवलममधील काही पुरुषांशी तिची ओळख होती. या लोकांच्या मदतीने त्याने जयंतनच्या शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्याची योजना आखली होती.
मध्यरात्री उठला, नवे कपडे घालून लावला टिळा; FB लाइव्ह करत तरुणाचं धक्कादायक पाऊल
ती दोनदा शहराच्या बाहेरील भागात शरीराचे अवयव टाकण्यासाठी आली होती. एकदा बसने आणि एकदा भाड्याने घेतलेल्या कॅबमधून. कोवलम पोलीस मृतदेहाच्या अवयवांची ओळख पटवून खुनात सहभागी असलेल्या इतरांचा शोध घेत आहेत.