JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Crime News : चालत्या गाडीत दारू पाजून महिलेचा विनयभंग, बेशुद्ध पडल्यावर फेकलं खड्ड्यात

Crime News : चालत्या गाडीत दारू पाजून महिलेचा विनयभंग, बेशुद्ध पडल्यावर फेकलं खड्ड्यात

महिलेने पोलिसांना तक्रार दिली असून या प्रकरणी तिघांवर विनयभंग आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

चालत्या गाडीत दारू पाजून महिलेचा विनयभंग, बेशुद्ध पडल्यावर फेकलं खड्ड्यात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चित्रकूट, 21 जुलै :  उत्तरप्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यात एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली सापडली. पोलिसांना ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती देऊन त्यांनी सार्वजनिक स्वास्थ्य केंद्रात महिलेला भरती केले. शुद्धीवर आल्यानंतर महिलेने पोलिसांना तक्रार दिली असून या प्रकरणी तिघांवर  विनयभंग आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली असून येथील 28 वर्षीय महिलेला तिच्या ओळखीचा व्यक्ती कामता प्रसाद भेटण्यासाठी रामुपुरवा गावात बोलावले. येथे महिला पोहोचल्यावर कामता प्रसादने त्याच्या दोन अनोळखी साथीदारांना बोलावून महिलेला बोलेरो गाडीत बसवले. त्यानंतर मऊ शहरातील निबी रोडवरील एका दारूच्या दुकानातून दारू विकत घेतली आणि तिघेही भरपूर प्यायले. यानंतर महिलेला देखील त्यांनी जबरदस्ती दारू पाजली. भरपूर दारू प्यायल्याने महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर यातिघांनी बेशुद्ध महिलेला मऊच्या चितवारा गावातील रस्त्याच्या किनाऱ्यावरील एका पाण्याने भरलेल्या खड्यात फेकले आणि तिघेही फरार झाले.

आरोपी महिलेला पाण्याने भरलेल्या खड्ड्यात फेकताना ग्रामस्थांनी पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला बेशुद्ध अवस्थेत मढ सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जिथे काही तासांनंतर शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी सोबत नेले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी कमता प्रसाद आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध विनयभंग आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीलाही ताब्यात घेतले आहे. Seema Haider News : अखेर सीमा हैदरचा पर्दाफाश! मंदिरात सचिन सोबत लग्न केलंच नाही? काय आहे सत्य पोलीस स्टेशनच्या प्रभाऱ्यांनी सांगितले की, “महिलेला शुद्धीवर आल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. महिलेच्या तक्रारीवरून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून महिलेच्या जबानीच्या आधारे आरोपींवर कायदेशीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या