JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / अवैध संबंधाचा संशय, छतावर झोपलेल्या महिलेचं धक्कादायक कांड

अवैध संबंधाचा संशय, छतावर झोपलेल्या महिलेचं धक्कादायक कांड

ही महिला घराच्या छतावर झोपली होती.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनिरुद्ध शुक्ला, प्रतिनिधी बाराबंकी, 7 जून : घराच्या छतावर झोपलेल्या विवाहित महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली. घटनेच्या वेळी महिलेचा पती आणि मुले लग्न समारंभासाठी गेले होते. घटनेची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ उडाली. काय आहे संपूर्ण प्रकरण - या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपासानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तर अवैध संबंधातून या महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा खून दरोड्याच्या उद्देशाने झाला नसून काही तथ्य समोर आले असून त्याआधारे तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच घटनेचा खुलासा होईल, असेही पोलिसांनी म्हटले.

ही घटना घूंघटेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारा गावातील आहे. येथे काल रात्री घराच्या गच्चीवर एकट्या झोपलेल्या विवाहितेचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. सकाळी या हत्येची माहिती नातेवाईकांना समजल्यानंतर कुटुंबात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक दिनेशकुमार सिंह यांच्यासह अन्य अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कसून चौकशी केली, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, मृत महिलाच्या नातेवाईकांसोबत आणि भावाची चर्चा केली जात आहे. त्यातून काही अँगल समोर येत आहे. महिला मृतावस्थेत पडून आहे. चाव्याही कमरेला लावलेल्या आहेत. गुन्ह्याची घटना पाहता ही हत्या दरोड्याच्या उद्देशाने झाली नसल्याचे दिसते. त्याआधारे तपासात काही तथ्य आढळून आले आहे. घटनेचा उलगडा लवकरच होईल, असे ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या