JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / कुत्र्यावर गोळी झाडली, पण घरकाम करणाऱ्या महिलेची काय चूक? नालासोपऱ्यात खळबळ

कुत्र्यावर गोळी झाडली, पण घरकाम करणाऱ्या महिलेची काय चूक? नालासोपऱ्यात खळबळ

वसई पश्चिमेकडील गिरज गावात एका इसमाने भटक्या कुत्र्यावर एअर गनने गोळी झाडली. पण ती गोळी घरकाम करून सायकलवरून घरी परतणाऱ्या 38 वर्षीय महिलेच्या पायाला लागल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी घडली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पालघर (नालासोपारा), 7 ऑक्टोबर : आपल्या वागणुकीने कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, अन्यथा अनेकदा त्याचे दुष्परिणाम भोगण्याची नामुष्की आपल्यावर ओढवू शकते. तसाच काहीसा प्रकार नालासोपाऱ्यात समोर आला आहे. एका इसमाने कुत्र्यावर झाडलेली गोळी एका महिलेला लागल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ज्या इसमाने गोळी झाडली होती त्याने खरंतर कुत्र्यावर रागात गोळी झाडली होती. पण त्याचा निशाणा चुकला आणि महिलेला गोळी लागली. या घटनेत एक निष्पाप महिला जखमी झाली आहे. वसई पश्चिमेकडील गिरज गावात एका इसमाने भटक्या कुत्र्यावर एअर गनने गोळी झाडली. पण ती गोळी घरकाम करून सायकलवरून घरी परतणाऱ्या 38 वर्षीय महिलेच्या पायाला लागल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी बंगली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास आणि चौकशी करत आहे. ( ‘पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट’, बॉम्बस्फोटाची धमकी, पुण्यात एकाला बेड्या ) गिरीजच्या बरमाळे तलाव याठिकाणी राहणाऱ्या सरिता भोईर (वय 38) या शुक्रवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घरकाम करून सायकलीवरून बदामी स्टॉप जवळून जात होत्या. माविको बंगल्याचे मालक मायकल कुटीन्हो यांच्या पाळीव कुत्र्याला भटका कुत्रा चावल्याने त्याला मारण्यासाठी त्यांच्या हातातील एअर गनने फायरिंग केली असता ती गोळी सरिता यांच्या उजव्या पायाच्या मांडीला लागून गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर सदर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. बंगली येथील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयातून एमएलसी आल्यावर वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या