प्रतिकात्मक फोटो
भोपाळ 05 जानेवारी : भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये आकांक्षा माहेश्वरी नावाच्या ज्युनियर डॉक्टरने बुधवारी वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. आकांक्षा गांधी मेडिकल कॉलेजमधून बालरोग विभागात पीजी करत होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेनंतर वसतिगृहात शोककळा पसरली आहे. याबाबत मृत तरुणीच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी डॉ.आकांक्षा तिच्या खोलीत होती. सायंकाळी वसतिगृहातील इतर मुलींनी आकांक्षा यांची खोली बंद असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी याबाबत वॉर्डनला माहिती दिली. बराच वेळ दार ठोठावल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने पोलिसांना कळवण्यात आलं. आठवीतील मुलाला शिक्षक वर्गातच म्हणाले ‘गळफास घेऊन आत्महत्या कर..’; पुढे भयानक घडलं घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी दार उघडलं असता डॉ.आकांक्षा बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं दिसलं. तपासात ती आधीच मरण पावल्याचं समोर आलं. आकांक्षाच्या खोलीतून पोलिसांना भूलीचं इंजेक्शन सापडलं. त्यामुळे आकांक्षाने औषधाचा ओव्हरडोज घेऊन आत्महत्या केल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक पानी सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये आकांक्षाने लिहिलं - ‘मी इतकी स्ट्राँग नाही, मी इतका ताण सहन करू शकत नाही. आई-बाबा सॉरी, माझ्या मित्र-मैत्रिणींचीही माफी मागते. मला इतकं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. मी स्ट्राँग नाही. वैयक्तिक कारणांसाठी मी हे पाऊल उचलत आहे.’ तो बिबट्याचा हल्ला नाही, बायकोला शिट्या मारतो म्हणून.. औरंगाबाद प्रकरणाला वेगळं वळण ज्युनिअर डॉक्टर आकांक्षा माहेश्वरी मूळची ग्वाल्हेरची असून गजराजा मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर ती सध्या भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमधून बालरोग विभागात पीजी करत होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.