कोल्हापूर, 10 ऑगस्ट: सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या शंभराव्या दिवशी (Hundredth day of marriage) तरुणीनं आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. सततचा जाच सहन न झाल्यामुळे तिनं विषप्राशन (poison) करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशी घडली घटना राधानगरी तालुक्यातील साक्षी उर्फ रुपाली डोंगळे यांचा विवाह इचलकरंजीत राहणाऱ्या संदीप डोंगळे यांच्याशी झाला होता. 2 मे 2021 या दिवशी लग्न झाल्यानंतर गेल्या 100 दिवसांत साक्षीचा छळ होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तिचा पती संदीप डोंगळे, सासू आकुबाई डोंगळे, सासरे साताप्पा डोंगळे आणि पोलिसांत असलेला दीर सुशांत डोंगळे या चौघांनी साक्षीचा छळ केल्याची तक्रार तिच्या माहेरच्यांची आहे. या जाचाला कंटाळून तिने दोन दिवसांपूर्वी विषारी औषध प्यायले होते. उपचारादरम्यान मृत्यू विषारी औषध प्यायल्यानंतर साक्षीला भोगावतीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे तिच्यावर पुरेसे उपचार होऊ शकत नसल्याचं लक्षात आल्यावर तिला कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हे वाचा - …अन् चाकू घेऊन फिरणाऱ्या मित्राची सटकली; एकाचा कापला कान, दुसऱ्याला केलं जखमी रुग्णालयात जोरदार वाद कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात साक्षीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर आरोप केले. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात जोरदार वाद झाला. रुग्णालयातच सर्वांचे आवाज वाढले आणि हमरीतुमरीला सुरुवात झाली. तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी जाब विचारल्याने सासरचे संतापले आणि प्रकरण हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र त्याचवेळी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची बातमी दिल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी हजर होत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी साक्षीचा पती, सासू, सासरे आणि दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.