प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Pexels)
मुंबई, 02 फेब्रुवारी : आपण ज्या जगात राहतो त्या जगाशिवाय आणखी एक जग आता माणसांनीच विकसित केलं आहे ते आभासी जग म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्ड (Virtual world). हे एक असं जग आहे, जिथं आपण प्रत्यक्षात नसतो पण तरी आपल्यासोबत सर्व प्रत्यक्षात घडतं आहे असंच वाटतं. पण आता भौतिक जगाप्रमाणे हे आभासी जगही महिलांसाठी सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. व्हर्च्युअल वर्ल्ड मेटावर्समध्ये आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे (Gangrape within 60 seconds in metaverse). मेटावर्समध्ये आलेल्या आपला भयावह अनुभव या महिलने सोशल मीडियावर मांडला आहे. ही महिला एका कंपनीत मेटावर्स रिसर्चची उपाध्यक्ष म्हणून काम करते. मेटावर्समध्ये जाताच 60 सेकंदाच तिच्यावर गँगरेप झाला, असं तिनं सांगितलं. महिलेला हे सर्व इतकं वास्तविक वाटलं की तिने भीतीने आपला हेडफोनही तोडून फेकून दिला. हे वाचा - …अन् ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचीच तंतरली; महिलेचा रिप्लाय पाहून स्वतःच केलं ब्लॉक झी न्यूज ने WION च्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार 43 वर्षांच्या या महिलेने मीडियम ब्लॉगवर आपली पोस्ट केली आहे. मेटोवर्सम्ये इतर युझर्सने तिच्या अवताराचं लैंगिक शोषण आणि सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तिने केला. आभासी जगात प्रवेश करताच काही सेकंदाच हे सर्व घडल्याचं तिनं सांगितलं. महिला म्हणाली, मेटावर्समध्ये गेल्यानंतर 60 सेकंदाच मला शाब्दिक आणि लैंगिकदृष्ट्या तीन-चार पुरुष अवतारांनी पुरुष आवाजांमार्फत त्रास दिला. त्यांनी माझ्या अवताराचा सामूहिक बलात्कार केला आणि फोटो घेतले. तसंच तुला हे आवडत नाही हा दिखावा करू नको, असा तिला मेसेज दिला. महिला इतकी घाबरली की तिने आपला हेडफोन तोडला.