JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नीचं कारस्थान, धावत्या बाईकवर दिलं विषारी इंजेक्शन; एका टीपमुळे भयंकर घातपाताचा खुलासा

पत्नीचं कारस्थान, धावत्या बाईकवर दिलं विषारी इंजेक्शन; एका टीपमुळे भयंकर घातपाताचा खुलासा

एका टीपमुळे मोठा खुलासा झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 22 सप्टेंबर : तेलंगणामधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे बाईकवरुन जाणाऱ्या व्यक्तीकडून लिफ्ट घेण्यात आली. आणि काही वेळानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला तर धक्कादायक माहिती समोर आली आहे. लिफ्ट घेणाऱ्या व्यक्तीने काही वेळानंतर बाईकस्वाराला विषाचं इंजेक्शन दिलं. ही घटना अपघात सिद्ध करण्याचा प्रयत्न होता, मात्र परिस्थिती बदलली. पोलिसांनी तपास केला तर हत्येमागे पीडित व्यक्तीची पत्नी असल्याचं समोर आलं. पोलिसांनी हत्या प्रकरणात पीडितीची पत्नी आणि एका आरएमपी डॉक्टरसह तिघांना अटक केली आहे. ही घटना हैद्राबादेतील खम्मम जिल्ह्यातील आहे. शेख जमाल (55) हे 19 सप्टेंबरच्या सायंकाळी आपल्या घरातून निघाले होते. ते आपल्या मुलीला भेटायला आंध्रप्रदेशातील गुंडराई गावात जात होते. वल्लभी गावाजवळ मंकी कॅप घातलेल्या एका अनोळख्या व्यक्तीने त्यांच्याकडून लिफ्ट मागितली. शेख जमाल थांबले आणि आरोपीला लिफ्ट दिली. काही वेळानंतर मागे बसलेल्या व्यक्तीने शेखच्या मांडीवर एक इंजेक्शन दिलं. पती-मुलावर बंदूक रोखून अपहरण, बेशुद्ध करुन नंतर महिलेसोबत भयानक कांड शेखला चक्कर येऊ लागली, त्यामुळे मागे बसलेल्या व्यक्तीने बाईक रोखण्यास सांगितली. आणि ती व्यक्ती तेथून निघून गेली. शेखने शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मदत मागितली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. यादरम्यान शेखने सांगितलं की, मागे बसलेल्या व्यक्तीने त्याला इंजेक्शन दिल्याचा संशय आहे. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान शेखचा मृत्यू झाला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, शेख यांच्या पत्नीने हत्येचं कारस्थान रचलं होतं. तब्बल दोन महिन्यांपूर्वी त्यांनी विषारी इंजेक्शन खरेदी केलं होतं. तिने अनेकदा पतीला ते इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला संधी मिळाली नाही. यानंतर तिने दुसरं कारस्थान रचलं. महिलेचा प्रियकर मोहन राव याने शेख यांना इंजेक्शन देण्याचा प्लान केला. यानुसार, त्याने लिफ्टच्या बहाण्याने शेखला विषारी इंजेक्शन दिलं. लिव्ह इन रिलेशनशिपनंतर शुभमंगल सावधान, एका नात्यामुळे तरुणाचा भयावह शेवट तर हत्या सिद्ध झालीच नसती… या घटनेत शेखने वेळीच शेतकऱ्यांकडून मदत मागितली आणि लिफ्ट घेणाऱ्या संशयास्पद व्यक्तीने इंजेक्शन दिल्याचा खुलासा केला. जर शेख यांनी वेळीच ही टीप दिली नसती तर हा घातपात असल्याचं सिद्ध होऊ शकलं नसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या