इंदूर, 11 डिसेंबर : मध्य प्रदेशची (Madhya Pradesh News) राजधानी भोपाळमधील अशोका गार्डनने पशुपालन विभागातील कर्मचारीचा पत्नीला (Crime News) मारहाण करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. ज्यात ही व्यक्ती बेशुद्ध अवस्थेतील पत्नीला रस्त्यावरून खेचून घेऊन जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केली आहे. सांगितलं जात आहे की, पशुपालन विभागात काम करणारे पाटस्कर यांच्या लग्नाला तब्बल 40 वर्षे झाली आहेत. आता ते आपल्या पत्नीपासून वेगळं राहतात. दोघांमध्ये बातचीत कमी होती. आज जेव्हा पत्नी कर्मचाऱ्याच्या घरी आली तर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. पाटस्करने घरातच पत्नीला मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याने पत्नीला खेचून बाहेर काढलं आणि आपटू लागला. पत्नी बेशुद्ध होऊन भररस्त्यात पडून होती. काही वेळानंतर पाटस्करने काही वेळानंतर तिचे दोन्ही हात पकडून उचलण्याचा प्रयत्न केला मात्र ती बसूही शकत नव्हती.
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ… ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यापैकी एका कॅमेऱ्यात घराच्या आत पती-पत्नी वाद करीत असल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या कॅमेऱ्यात पत्नीला खेचून रस्त्यावर आणत असतानाचं दिसत आहे. हा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला त्यानंतर अशोका गार्डन पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी ठाण्याचे प्रभारी आलोक श्रीवास्तन यांनी सांगितलं की, यातील पाटस्करच्या विरोधात 323 आणि 498 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.