JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / लग्नाच्या 27 वर्षांनंतर पत्नीचे 'पर्सनल लाइफ' बनले पतीसाठी जीवघेणे, नेमकं प्रकरण काय?

लग्नाच्या 27 वर्षांनंतर पत्नीचे 'पर्सनल लाइफ' बनले पतीसाठी जीवघेणे, नेमकं प्रकरण काय?

पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पवन सिंह कुंवर, प्रतिनिधी हल्द्वानी, 25 मे : उत्तराखंडमधील हल्दवानी शहरातील मुखानी परिसरातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे लग्नाच्या 27 वर्षानंतर एक व्यक्ती आपल्या पत्नीच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्रासला आहे. तसेच, पत्नीच्या मित्रांनी त्याला धमकी दिल्याचा आरोप त्याने केला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या या पतीने थेट पोलीस ठाणे गाठले. आता पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या दोघांच्या लग्नाला 27 वर्षे झाली आहेत. यासोबतच त्यांच्या तीन मुलांपैकी एका मुलीचेही लग्न झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुखानी पोलिस स्टेशननुसार, पीडितेच्या पतीने सांगितले की, त्यांच्या लग्नाला 27 वर्षे झाली आहेत. त्याची पत्नी गृहिणी असून त्यांना तीन मुलेही आहेत.

मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. शहजाद कुरेशी आणि अभिषेक सिंग हे त्याच्या पत्नीचे मित्र आहेत. पत्नी आपल्या कमाईतून दर महिन्याला त्या दोघांच्या बँक खात्यात पैसे पाठवते. विरोध केल्यावर ही माझी पर्सनल लाईफ आहे, असे सांगत पत्नी तिच्या पतीला बेदम मारहाण करते. याबाबत पतीला आरोपींशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. मुखानी पोलिस स्टेशनचे एसओ रमेश बोहरा यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपांची चौकशी सुरू आहे. आरोप खरे ठरल्यास दोन्ही तरुणांना अटक करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या