पाटणा 26 मार्च : भारतीय समाजात जावयाला खूप आदर दिला जातो, पण आज जी घटना समोर आली आहे, ती अतिशय अजब आहे (Weird Incident). बिहारमधील जमुई जिल्ह्यात एका व्यक्तीला सासरच्या मंडळींनीच त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. लाख प्रयत्न करूनही सासरचे लोक पत्नीला सोबत पाठवत नसल्याचं पीडित व्यक्तीचं म्हणणं आहे. पीडित व्यक्तीचं म्हणणं आहे की त्याची पत्नी माहेरीच राहाते. तो पत्नीला आणण्यासाठी जेव्हा तिच्या माहेरी गेला तेव्हा सासरकडच्या लोकांनी त्याला खोलीत कोंडून मारहाण केली. पीडित व्यक्तीने आता न्यायासाठी जमुईच्या पोलीस अधीक्षकांकडे मदत मागितली आहे. दुसरीकडे, स्थानिक पोलिसांचं म्हणणं आहे की, त्याच्या पत्नीला त्या व्यक्तीसोबत राहायचं नाही (Husband Wife Dispute). मारहाणीप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जमुई जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील दौलतपूर गावातील रहिवासी असलेल्या 36 वर्षीय विकास कुमारसोबत हा प्रकार घडला आहे. Jalgaon: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीने मध्यरात्री गाठलं तरुणाचं घर आणि केलं धक्कादायक कृत्य विकास कुमारने पत्नी रिंकी कुमारीला घरी आणण्यासाठी सासरच्यांसमोर अनेक मागण्या केल्या. जेव्हा तो पत्नीला घरी आणण्याविषयी बोलतो तेव्हा सासरच्या लोकांकडून त्याचा छळ होतो आणि त्याला मारहाण केली जाते, असा आरोप त्याने केला आहे. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मेहुणा प्रदीप शर्मा आणि चिंटू शर्मा यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी विकास 1 वर्षापासून करत आहे, मात्र अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. विकास हा नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात राहातो. विकासचं लग्न 14 मे 2011 रोजी जमुई जिल्ह्यातील सोनो पोलीस स्टेशनच्या हद्दीतील औरैया गावातल्या रिंकी कुमारीसोबत झालं होते. 2014 साली विकास पत्नी रिंकीसोबत दमणला गेला होता. तिथून दोघेही मार्च 2015 मध्ये परतले होते. होळी साजरी करण्यासाठी त्याची पत्नी रिंकी आपल्या मुलांसह माहेरी गेली होती. होळीनंतर विकास पत्नीला घरी परत आणण्यासाठी गेला, तेव्हा तिच्या माहेरच्यांनी तिला परत पाठवण्यास नकार दिला होता. यानंतर आपल्या पत्नीला सोडून मुलासह घरी परतल्याचं विकासने सांगितलं. अनेकदा मागणी करूनही माहेरच्यांनी रिंकीला सासरी पाठवलं नाही. यानंतर विकासने कोर्टात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून पत्नी रिंकी सासरच्या घरी परतली होती. 2 बायका फजिती ऐका! संपत्ती नव्हे, तर दोघींसाठी चक्क पतीचीच करावी लागली वाटणी विकासच्या सासऱ्याचं वर्षभरापूर्वी मार्च 2021 मध्ये निधन झालं. यानंतर वडिलांच्या श्राद्ध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विकास रिंकीला तिच्या माहेरी घेऊन गेला. विकासचा आरोप आहे की, जेव्हा तो त्याच्या पत्नीला तिच्या माहेरी घेऊन गेला तेव्हा सासरच्या लोकांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. विकासचं म्हणणं आहे की त्याने त्यांना ५ हजार रुपये दिले. सासऱ्याचं श्राद्ध आटोपल्यावर तो पत्नीला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच सासरच्यांनी त्याला खोलीत कोंडलं. विकासचा आरोप आहे की त्याची सासू, मेहुणी आणि मेहुण्यांनी त्याला जबर मारहाण केली. गंभीर स्थितीत त्याला पाटणामधील रुग्णालयात दाखल कऱण्यात आलेलं. बरेच दिवस उपचार घेतल्यानंतर अखेर विकास घरी घरी परतला. यानंतर त्याने पत्नीला सासरी पाठवण्याची विनंती केली. मात्र त्याची पत्नी घरी आली नाही. विकासने आपल्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. मात्र काहीही कारवाई झाली नाही. त्याची पत्नी सध्या माहेरीच आहे. पीडित व्यक्तीला एक मुलगा आणि दोन मुलीही आहेत. मुलगा विकासकडे तर दोन मुली रिंकीकडे राहातात. दुसरीकडे स्थानिक पोलिसांचं असं म्हणणं आहे की रिंकीला पती विकाससोबत राहायचं नाही