JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / 6 हजारांच्या वादातून बायकोचे नियंत्रण सुटले, नवऱ्यासोबत केलं भयानक कांड

6 हजारांच्या वादातून बायकोचे नियंत्रण सुटले, नवऱ्यासोबत केलं भयानक कांड

अवघ्या 6 हजार रुपयांच्या वादातून पत्नीने पतीसोबत भयानक कांड केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात

पतीची हत्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपूर, 3 फेब्रवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच पती-पत्नीच्या वादातून हत्या केल्याच्याही घटना घडत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या ६ हजार रुपयांच्या वादातून पतीची हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - अवघ्या 6 हजार रुपयांच्या वादातून पतीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आली आहे. बिधानूच्या सुरौली गावात 6000 रुपयांसाठी पतीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या मोनिकाने बुधवारी दुपारी घटनेची कबुली दिली. यानंतर सर्वांनाच धक्का बसला. मोनिकाने आपल्या पतीचा मृतदेह खोलीत पुरल्यानंतर, हत्येचे रहस्य उघड होऊ नये म्हणून त्याच्यावर दिवाण पलंग टाकला होता. यानंतर ती रात्रभर त्यावर झोपली. पोलीस मोनिकाच्या दारात पोहोचले असता तिने गेट उघडले नाही. शेजारच्या घरातून पोलीस कसेतरी आत पोहोचले. महिला कॉन्स्टेबलने मोनिकाला उमेशबद्दल विचारले असता तिने हाताने खुनाची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी जमीन खोदून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात आणले. तिथे विचारणा केली असता ती म्हणाली, आधी मला चहा आणि बिस्किटे खायला द्या, मग मी तुम्हाला सर्व काही सांगते. पोलिसांनी यानंतर तिची इच्छा पूर्ण केली. मात्र, नाश्ता केल्यानंतर ती अचानक बेशुद्ध पडली. पोलिसांनी त्याला सीएचसीमध्ये दाखल केले. जिथे डॉक्टरांनी ती निरोगी असल्याचे सांगितले. हेही वाचा -  मालेगाव : दारू प्यायला पैसे दिले नाही, दोन मुलांनी आईसोबत केलं भयानक कृत्य मोनिका आणि उमेश यांची दोन मुले गावातील प्राथमिक शाळेत शिकतात. बुधवारी सकाळी दहा वाजता मोनिकाने दोघांनाही शाळेत पाठवले होते. दुपारी उमेश झोपला असताना पत्नी मोनिकाने त्याचा टॉवेलने गळा आवळून खून केला. तसेच यानंतर कुदळीच्या सहाय्याने खोलीची कच्ची जमीन खोदली आणि नंतर त्यात त्याचा मृतदेह पुरला. मोनिकाचे रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला. या घटनेत मोनिकासोबत आणखी कोणाचा हात असण्याची शक्यता पोलिसांना आहे. सध्या पोलीस मोनिकाच्या बरे होण्याची वाट पाहत आहेत. यानंतर तिची अधिक कडक चौकशी करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या