यवतमाळ, 7 जून : पती-पत्नीचे (Husband Wife Relation) नाते साता जन्माचे असते, असे म्हणतात. एकमेकांच्या सुख दु:खात ते साथ देतात. एकमेकांशिवाय जगणे त्यांना अशक्य असते. यामुळेच की काय, पतीच्या निधनानंतर (Husband Death) एका पत्नीने धक्कादायक पाऊल उचलले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका महिलेच्या पतीचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू (Husband Death) झाला होता. यानंतर ती नैराश्यात (Wife Depression after Husband Death) आली होती. पतीच्या निधनानंतर ती आपल्या चिमुकलीसह माहेरी आली होती. मात्र, येथेही तिला एकाकीपण जाणवत होते. त्यातूनच ती नैराश्यात गेली. यातूनच तिने एक धक्कादायक निर्णय घेतला. या महिलेने आपल्या चिमुकलीसह अखेर गळफास घेतला. यात महिलेचा मृत्यू झाला. तर सुदैवाने नऊ महिन्याची चिमुकली बचावली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. रोशनी आशिष झाडे (वय 24), असे मृत महिलेचे नाव आहे. तर काव्या असे बचावलेल्या नऊ महिन्याच्या चिमुकलीचे नाव आहे दोन वर्षांपूर्वी मोरेगाव तालुक्यातील मार्डी येथील रहिवासी जीवन वैद्य यांची मुलगी रोशनी हिचा विवाह हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील आशिष झाडे या तरुणाशी झाला होता. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक धक्कादायक प्रसंग घडला. रोशनी हिचा पती आशिष झाले याचे दुर्दैवाने अचानक निधन झाले. पतीच्या निधनानंतर रोशनीच्या जीवनात आभाळच कोसळले होते. आशिषच्या निधनानंतर नऊ महिन्याच्या चिमुरडीला सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती. तिला आलेले एकाकीपण यातून ती आपल्या माहेरी आईवडिलांकडे मार्डी येथे आली होती. हेही वाचा - लग्नानंतर 5 महिन्यांत संपवलं आयुष्य, नवविवाहित जोडप्याची ‘या’ काळजीनं आत्महत्या मात्र, आईवडिलांकडे आल्यानंतरही ती नैराश्याच्या गर्तेतून बाहेर येत नव्हती. अखेर पतीच्या निधनानंतर आलेल्या नैराश्यामुळे तिने एक धक्कादायक निर्णय घेतला. रोशनी हिने मंगळवारी सकाळच्या सुमारास राहत्या घरी आपल्या चिमुरडीसह गळफास घेतला. यात चिमुरडी काव्याचा गळफास सुटल्याने ती खाली पडली. मात्र, रोशनीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काव्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.