ग्वाल्हेर, 30 जुलै : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील एक मुलगा आणि पंजाबमधील एका मुलीमध्ये सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर तुम्ही विचारही केला नसेल इतक्या लवकर ब्रेकअपमध्ये झाले. वर्षभरापूर्वी दिल्लीत एका लग्न समारंभात दोघांची भेट झाली होती. यानंतर 15 दिवसातच दोघे प्रेमात पडले. मात्र, त्यानंतर जे घडले ते वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. काय आहे संपूर्ण प्रकरण - या दोघांची एकमेकांशी ओळख झाल्यानंतर 15 दिवसातच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर 16 व्या दिवशीच दोघांचे लग्न झाले. लग्न झाल्यावर नवीन सून ग्वाल्हेरला आली आणि अवघ्या 20 दिवस पतीसोबत राहून पंजाबला परतली. कारण मैत्री, प्रेम आणि लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये रोज भांडणे सुरू झाली. 20 दिवसात माहेरच्या घरी जाणारी सून 1 वर्षापासून पंजाबमध्ये आहे. आता पंजाबमध्ये हुंडा कायद्याबाबत सुनेने पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पंजाब पोलिसांनी ग्वाल्हेरमध्ये कारवाई करत सुनेच्या तक्रारीवरून सासूला अटक केली आहे. तर तिच्या पतीला आधीच अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव सिंग नावाचा तरुण व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. तो ग्वाल्हेरच्या पडव पोलीस स्टेशन हद्दीतील कांती नगरमध्ये राहतो. गौरवची दिल्लीत पूनम नावाच्या मुलीशी एक वर्षापूर्वी भेट झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीनंतर दोघांनी 16 व्या दिवशी लग्न केले. ही तरुणी ग्वाल्हेरमध्ये गौरव सिंगसोबत राहू लागली. त्याचे कुटुंबही गौरवसोबत राहते. हेही वाचा - Shocking! 11 व्या मजल्यावरुन महिलेने मारली उडी; शेजारच्या खोलीत होतं कुटुंबीय मात्र, लग्नाच्या 20 दिवसातच पूनम पंजाबमध्ये तिच्या माहेरी चालली गेली. यानंतर गौरवने अनेक वेळा तिला घरी येण्याबाबत विनंती केली मात्र, गौरवने मनवल्या नंतरही तिने येण्यास नकार दिला. तर दुसरीकडे गौरव दुसऱ्या एका प्रकरणात तुरुंगात आहे. त्याचवेळी, पूनमने पती गौरव आणि सासूविरुद्ध हुंडा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी गौरवच्या आईला अटक करून पंजाबला नेले आहे. हुंड्यासाठी त्रास देत असल्याने पूनमने पोलिसांत धाव घेतली, असे तिने सांगितले.