JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / विरोधकांना फसवण्यासाठी बायकोवर झाडली गोळी, नंतर त्याच्यासोबतही घडलं भयानक!

विरोधकांना फसवण्यासाठी बायकोवर झाडली गोळी, नंतर त्याच्यासोबतही घडलं भयानक!

नारायणने गहाण ठेवलेल्या जमिनीवर 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असे शेवटच्या पंचायतीमध्ये ठरले.

जाहिरात

रुग्णालय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अश्वनी कुमार, प्रतिनिधी झांसी, 9 जून : उत्तर प्रदेशच्या झाशीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे हिस्ट्रीशीटर आणि त्याच्या पत्नीवर गोळी झाडली गेली. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. तर हिस्ट्रीशीटरला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पत्नीच्या तेराव्याच्या दिवशी संशयास्पद परिस्थितीत हॉस्पिटलच्या तिसर्‍या मजल्यावरून पडल्याने त्या हिस्ट्रीशीटरचाही मृत्यू झाला. कोट्यवधींची जमिनीतून हे कांड घडले असावे, असा सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोटयवधींची जमीन विरोधकांकडे गहाण ठेवल्यानंतर ही जमीन परत घेण्यासाठी आरोपीने कट रचला. विरोधकांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आरोपीने विरोधकांना अडकवण्यासाठी पत्नीवर गोळी झाडली. मात्र, त्याचा निशाणा चुकला आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूने घाबरलेल्या नारायण सिंहनेही त्याच्या खांद्यावर गोळी झाडली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. 26 मे रोजी कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉरन गावात या जोडप्यावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इथे हिस्ट्रीशीटर नारायण सिंह याच्या पत्नीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. त्याचवेळी गोळी लागल्याने नारायणही गंभीर जखमी झाला. 26 मे रोजीच नारायण सिंग याला गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच्या पत्नीच्या तेराव्याच्या दिवशीच त्याचा संशयास्पद अवस्थेत सुपर स्पेशालिस्ट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले.

जमिनीची नोंद करून घेतल्याचा आरोप - लारोन गावातील रहिवासी नारायण सिंह याचा मुलगा ब्रिजेंद्र याने आरोप केला आहे की, 2016 मध्ये त्याच्या अनुपस्थितीत गावातील 7 लोकांनी फसवणूक करून त्यांच्या नावावर गहाण ठेवलेली जमीन वडिलांचा विश्वास जिंकून 5 लाख रुपयांना नोंदवली. गहाण ठेवलेली जमीन 20 बिघे आहे. काही दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणावरून नारायण सिंह आणि गावातील 7 आरोपींमध्ये अनेकदा पंचायत झाली. शेवटी, नारायणने गहाण ठेवलेल्या जमिनीवर 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असे शेवटच्या पंचायतीमध्ये ठरले. सात वर्षांच्या व्याजासह एकूण 41 लाख रुपये देण्यावरून बोलणी सुरू झाली. बराच संघर्ष केल्यानंतर नारायण सिंह याने त्याची जमीन परत घेण्याच्या बदल्यात पंचायतीमधील विरोधकांना 25 लाख रुपये देण्याचे मान्य केले. यापूर्वी 2016 पासून सात वर्षात मृताचा मुलगा बृजेंद्र याने आरोपींना व्याज म्हणून 400 क्विंटल गहू दिल्याचेही सांगितले. गहाण ठेवलेली जमीन सोडवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावर ते दरवर्षीचे पीक आरोपींना व्याज म्हणून देत असत, असा दावाही बृजेंद्रने केला आहे. पंचायतीमध्ये निर्णय झाल्यानंतर, त्याचे वडील 22 लाख 50 हजार रुपये घेऊन पत्नीसह सात आरोपींच्या घरी गेले. मात्र, वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपींनी त्यांचे पैसे हिसकावले आणि आई-वडिलांवर गोळ्या झाडल्या. यात आईचा जागीच मृत्यू झाला. तेथे वडील गंभीर जखमी झाले, असा आरोप त्याने केला आहे. दरम्यान, याप्रकरणी सत्य काय आहे, ते पोलीस तपासात समोर येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या