JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / ते एक वाक्य जिव्हारी लागलं अन् महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, पतीच्या कॉलने घेतला पत्नीचा जीव

ते एक वाक्य जिव्हारी लागलं अन् महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, पतीच्या कॉलने घेतला पत्नीचा जीव

एका पतीने फोन करून पत्नीला असं काही सांगितलं की तिने जगाचा निरोपच घेतला. हे प्रकरण पलानी डेरा परिसरातील आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 12 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने फोन करून पत्नीला असं काही सांगितलं की तिने जगाचा निरोपच घेतला. हे प्रकरण पलानी डेरा परिसरातील आहे. घरापासून काही अंतरावर एका विवाहितेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना दिली. जेवणात केस निघाल्याने पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले अन् सगळ्यांसमोरच… पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृत महिलेच्या नातेवाईकांनी असा आरोप केला आहे, की त्यांच्या जावयाने दुसरं लग्न करेल, अशी धमकी त्यांच्या मुलीला फोनवर दिली होती. यामुळे दुखावलेल्या त्यांच्या मुलीने आत्महत्या केली. मृत महिलेचे वडील गुलाब सिंह यांनी सांगितलं की, त्यांनी तीन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचं लग्न मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात केलं होतं. महिलेच्या वडिलांनी सांगितलं, की लग्न झाल्यापासूनच जावई मुलीवर अत्याचार करत असे. यामुळे व्यथित होऊन काही दिवसांपूर्वी मुलगी तिच्या माहेरच्या घरी राहू लागली होती. मात्र इथेही जावई मुलीला फोन करून धमकावत राहिला. रविवारीही जावयाने मुलीला फोन करून तिला सोडून दुसरं लग्न करणार असल्याचं सांगितलं. पतीला तुरुंगात पाठवून प्रियकरासोबत फरार झाली 5 मुलांची आई; संपूर्ण कांड जाणून व्हाल शॉक मृत महिलेच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीला हे सगळं सहन झालं नाही. रात्री ती आपल्या तान्ह्या मुलीसोबत झोपायला गेली. सोमवारी सकाळी महिला घरी नसल्याचे पाहून सर्वांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलं की, महिलेचा मृतदेह शेताजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. ही माहिती मिळताच घरच्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मयताच्या वडिलांनी रडत रडत सांगितलं की, स्वप्नातही वाटलं नव्हतं की आमची मुलगी असं पाऊल उचलेल. आता तिच्या तान्ह्या बाळाचं काय होणार? दुसरीकडे, स्टेशन प्रभारी कुलदीप कुमार यांनी सांगितलं की, महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे. आरोपी पतीची चौकशी केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या