JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिनी; क्रूरतेचा कळस गाठत पतीसोबत केलं भयानक कृत्य

दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिनी; क्रूरतेचा कळस गाठत पतीसोबत केलं भयानक कृत्य

दीड वर्षापूर्वी जमिनीच्या वादातून तिने पतीला अन्न पदार्थात उंदीर मारण्याचं औषध टाकून ठार मारलं. त्यानंतर धारदार शस्त्राने पतीचा गळा कापून मृतदेह गोणीत भरून खोलीत लपवून ठेवला.

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 31 ऑक्टोबर : गुन्ह्याच्या अनेक धक्कादायक आणि भयानक घटना दररोज समोर येत असतात. आता मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील मौगंज पोलीस ठाण्याने दीड वर्षांपूर्वी घडलेल्या हत्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. यात मृताच्या दुसऱ्या पत्नीचे आपल्या लहान दिरासोबत अनैतिक संबंध होते. दीड वर्षापूर्वी जमिनीच्या वादातून तिने पतीला अन्न पदार्थात उंदीर मारण्याचं औषध टाकून ठार मारलं. त्यानंतर धारदार शस्त्राने पतीचा गळा कापून मृतदेह गोणीत भरून खोलीत लपवून ठेवला. या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. दोन दिवसांपूर्वी जंगलात एक सांगाड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आणि एफएसएल टीमने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले, त्यानंतर हा सांगाडा रामसुशील पालचा असल्याचं उघड झालं असून तो दीड वर्षांपासून बेपत्ता होता. पनवेल : पानटपरीवर धक्का लागल्याच निमित्त झालं अन् तरुणासोबत घडलं भयानक कांड ही धक्कादायक घटना मऊगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी गावातील आहे. दोन दिवसांपूर्वी जंगलात एक सांगाडा सापडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने तपास केला असता संशयाची सुई मृताच्या दुसऱ्या पत्नीभोवती फिरली. तिच्याकडे कसून चौकशी केली असता खुनाचे गुपित उघड झालं. मृत रामसुशील पाल याची दुसरी पत्नी रंजना पाल हिचे तिच्या लहान दिराशी प्रेमसंबंध होते. तसंच मृतक आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये पूर्वीपासून जमिनीचा वाद होता. एसपी नवनीत भसीन यांनी सांगितलं की, दीड वर्षांपूर्वी मृताची दुसरी पत्नी आणि तिचा दीर गुलाब पाल यांनी रामसुशीलच्या हत्येचा कट रचला होता. पत्नीने बाजारातून समोसे आणि चाट मागवलं. यानंतर तिने यामध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळून पतीला खाऊ घातलं. यानंतर तिने तिचा प्रियकर दीर गुलाब पाल याला पतीच्या मृत्यूची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी गुलाब पाल याने त्याचा भाऊ अंजनी पाल याच्यासोबत मिळून धारदार शस्त्राने महिलेच्या पतीचा गळा कापला. मृतदेह गुन्ह्याच्या ठिकाणाहून दूर नेऊन एका खोलीत ठेवलेल्या पेंढ्याच्या ढिगाऱ्याखाली पुरण्यात आला. दुचाकी थांबवून तरुणाच्या डोक्यात सपासप वार; मध्यरात्री सिंहगड रस्त्यावर थरार, परिसरात खळबळ गेल्या दीड वर्षांपासून मृत व्यक्ती घरी दिसत नव्हती. यादरम्यान, शेजारच्या लोकांनी मयताची दुसरी पत्नी आणि कुटुंबीयांकडे चौकशी केली असता, तो बाहेर काम करून पैसे कमवायला गेला असल्याचंते सांगत असत. शेजारच्या लोकांना राम सुशीलच्या हत्येचा संशय आला नाही कारण मृतक अनेकदा दीड महिना तर कधी 15 ते 20 दिवसांसाठी घरी नसायचा. या घटनेतील आरोपींनी हत्येनंतर दीड वर्षानंतर मृतदेह खोलीतून बाहेर काढला. मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि तो जंगलात फेकून पळ काढला. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि भावासह चार जणांना अटक केली आहे. मृताची दुसरी पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशात होती, तिला तिथून ताब्यात घेण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या