पाटणा 23 डिसेंबर : नवरा आणि बायकोचं नातं हे प्रेमासोबतच विश्वासावरही टिकून असतं. त्यामुळे या नात्यात कोणी एकानेही दुसऱ्याची फसवणूक केली, तर या नात्याचा शेवटही भयानक होतो. अशीच एक घटना आता बिहारमधून समोर आली आहे. बिहारच्या दरभंगामध्ये पती आणि पत्नीचा हाय व्होल्टेज ड्रामा रस्त्यावरच पाहायला मिळाला. महिलेनं आपल्या पतीची रस्त्यावरच धुलाई केली. Kolhapur Firing News : मुलीसोबत गैरकृत्य करत होता पती, नकार दिल्याने थेट पत्नीवरच गोळीबार, कोल्हापुरातील घटनेने खळबळ हा प्रकार पाहून आसपासचे लोकही हैराण झाले. पतीची धुलाई केल्यानंतर महिला त्याची कॉलर पकडून त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेली. इथे तिने संपूर्ण प्रकार सांगितला. ही घटना दरभंगाच्या लहेरियासराय ठाण्याच्या परिसरातील आहे. यात एक महिला आपल्या पतीवर लक्ष ठेवत याठिकाणी पोहोचली. तिला अशी माहिती मिळाली होती, की तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत. इतकंच नाही तर त्याने दुसरं लग्नही केलं होतं. महिलेने पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच तिला राग अनावर झाला. तिने पतीला पकडून रस्त्यावरच मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचा राग पाहून बचावासाठी तिच्या पतीने पळून जाण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. मारहाण करणाऱ्या महिलेनं सांगितलं की, तिचं 12 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, तिला तीन मुलं आहेत. घरात घुसून 15 जणांचं महिला सरपंचासोबत धक्कादायक कृत्य, बुलडाण्याला हादरवणारी घटना पतीने महिलेला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलं होतं. यानंतर त्यानं दुसरं लग्नही केलं. याबाबत माहिती मिळताच महिला पतीच्या शोधात येथे पोहोचली होती. या महिलेनं पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे, मात्र पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचं महिलेचं म्हणणं आहे. दुसरीकडे, पहिल्या पत्नीसोबत राहत असतानाच पुन्हा दुसरं लग्न केल्याचं पतीनं मान्य केलं आहे.