JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / मुंबईतील सर्वात मोठी बातमी! वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्याला बेड्या, मोठा घातपात घडवण्याचा होता कट?

मुंबईतील सर्वात मोठी बातमी! वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्याला बेड्या, मोठा घातपात घडवण्याचा होता कट?

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगालच्या दहशतवादी विरोधी पथकाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने एका संशयित जिहादीला ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 सप्टेंबर : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत खूप मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट होता की काय, असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. बंगालच्या दहशतवादी विरोधी पथकाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने एका संशयित जिहादीला ताब्यात घेतलं आहे. एटीएसने मुंबईच्या वांद्रे येथून संशियत जिहादीला बेड्या ठोकल्या आहेत. हा संशयित आरोपी एका दहशतावादी संघटनेच्या संपर्कात होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वारंवार दहशवादी हल्ल्याची धमकी देण्यात येत आहे. या दरम्यान एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी विरोधी पथकाला हे मोठं यश आल्याचं मानलं जात आहे. पश्चिम बंगाल एटीएसला माहिती मिळाली होती की, एक संशयित जिहादी मुंबईत लपून बसलेला आहे. त्यानंतर बंगालच्या एटीएसने महाराष्ट्र एटीएससोबत समन्वय साधला. बंगाल एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने वांद्र्यातील निर्मल नगर भागातून सद्दाम हुसैन खान नावाच्या 34 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं. पश्चिम बंगाल पोलिसांनी आणखी एका जिहादीला अटक केली आहे. त्याला डायमंड हार्बर येथून अटक करण्यात आली आहे. दोन्ही संशयित जिहादी आहेत. ( आईने स्वत:च्या तीन मुलींची केली हत्या, सकाळी पोहोचली पोलीस ठाण्यात; हादरवणारं कारण ) अटक करण्यात आलेल्या दोघांवर गंभीर आरोप आहेत. हे आरोपी सातत्याने एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते. या प्रकरणी बंगाल पोलिसांचा तपास सुरु आहे. याशिवाय बंगालच्या तपास यंत्रणादेखील युद्ध पातळीवर तपास करत आहेत. हे संशयित आरोपी आणखी कुणाकुणाच्या संपर्कात होते याचा तपास सुरु आहे. या आरोपींचा काही घातपात घडवण्याचा कट होता का? याचा तपास सुरु आहे. पण मुंबईत संशयित जिहादीला पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या