प्रातिनिधीक फोटो
जयपूर, 10 जानेवारी : देशातील वाढणारी चाइल्ड लेबरची (Child Labour) संख्या हा सध्या चिंतेचा विषय आहे. आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. परिणामी शिक्षण व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. येत्या काळात कुटुंबाची गुजराण करण्यासाठी गरीब घरातील लहान मुलांवरही पैसे कमावण्याची जबाबदारी येऊ शकते आणि त्यामुळे चाइल्ड लेबरचं प्रमाण वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान असचं एक वृत्त समोर आलं आहे. राजस्थानमधील (Rajasthan News) चित्तोड जिल्ह्यात लहान मुलंदेखील नोकरीचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे भटकत आहे. ही लहानगी नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जाण्यासाठीही घाबरत नसल्याचं दिसून येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील केवलपुरा गावात 14 वर्षांचा मुलगा नोकरीसाठी तेलंगण्याला पोहोचला. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष प्रियांका पालीवाल यांनी सांगितलं की, 3 जानेवारी रोजी आदिलाबाद, तेलंगण्यात केवलपुरा गावात एक 14 वर्षांचा मुलगा बालश्रम करीत असल्याचं दिसला होता. श्रम विभाग आणि पोलिसांनी मुलाला बाल कल्याण समितीकडे सोपवलं. हे ही वाचा- अंथरुणाला खिळलेल्या तरुणाला बापाने दिला भयंकर मृत्यू; जीव जाईपर्यंत घातले घाव पैसे कमवण्यासाठी हा मुलगा शेजारच्यांसोबत तेलंगणात पोहोचला. येथे त्याची चौकशी केली असता कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचं कळालं. त्याच्या मामाचा मुलगा तेलंगणात पाणी पुरी विकण्याचं काम करतो. कुटुंबात सर्वजण मजुरी करतात. त्यामुळे मुलाला त्याच्या भावासह तेलंगणात पाठवण्यात आलं. येथे तो ठेल्यावर मजुरीचं काम करीत होता. तीन महिने त्याने येथेच काम केलं. पोलीस प्रोटेक्शनसह मुलगा चित्तोडसा आला. येथे मुलाला रेस्क्यू केल्यानंतर त्याच्या आई-वडिलांशी संपर्क करण्यात आलं.