JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / गुटखा शौकीन चोरांचा कारनामा! चोरला 10.50 लाख रुपयांचा विमल गुटखा

गुटखा शौकीन चोरांचा कारनामा! चोरला 10.50 लाख रुपयांचा विमल गुटखा

Gutkha Robbery in Gujarat: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सर्व काही बंद होतं आणि तंबाखूपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी तुम्ही गुटखा, बिडी, सिगारेट यांसारख्या वस्तूंच्या चोरीच्या घटना ऐकल्या असतील, परंतु अशा घटना अजूनही घडत आहेत.

जाहिरात

गुटखा शौकीन चोरांचा कारनामा! चोरला 10.50 लाख रुपयांचा विमल गुटखा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 ऑगस्ट:  लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सर्व काही बंद होतं. याकाळात तंबाखूपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी तुम्ही गुटखा, बिडी, सिगारेट यांसारख्या वस्तूंच्या चोरीच्या घटना ऐकल्या असतील. परंतु अशा घटना अजूनही घडत आहेत.  सुरतच्या बारडोलीमध्ये विमल गुटख्याचा साठा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी सुमारे 8 जणांनी एका गोडाऊनमध्ये घुसून चौकीदाराला बंधक बनवून 10.50 लाख रुपये किमतीचा विमल गुटखा चोरून पळ काढला. गुजरातमधील सुरत येथील बारडोलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. विमल चोरीची संपूर्ण घटना गोदामातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरतमधील बारडोली येथील कडोदरा चार रस्त्याजवळ जयंबे ट्रेडर्सचे गोदाम आहे. पहाटे चारच्या सुमारास आठ चोरांनी या गोदामाला लक्ष्य केलं. एका कारमधून हे चोर गोदामाजवळ आले. गोदामच्या बाहेर त्यांनी आपली गाडी थांबवली. दरम्यान गोदामात उपस्थित वॉचमननं त्यांना तिथं गाडी थांबवण्याचं कारण विचारलं. परंतु त्यानंतर चोरट्यांनी या वॉचमनलाच पकडून त्याला ओलीस ठेवले. यानंतर चोरट्यांनी गोदामात प्रवेश करून विमल गुटख्याचा सुमारे 10.50 लाख रुपयांचा साठा चोरून पोबारा केला. दरम्यान गुटखा चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हेही वाचा - Commonwealth : दीपक पुनियाची पाकिस्तानला धोबीपछाड, कुस्तीमध्ये भारताची गोल्डन हॅट्रिक! पोलीसांकडून या प्रकरणाच्या तपास सुरु- यानंतर तस्करांनी गोदामात प्रवेश करून विमल गुटख्याची तब्बल 42 पोती आणि 25 सैल पाकिटं चोरून नेली. तस्करांनी गोदामाबाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही काठ्यांनी फोडले. सकाळी 10.50 लाख रुपयांचा विमल गुटखा चोरीला गेल्याची माहिती गोदामाच्या मालकाला मिळावी, त्यानंतर त्यांनी कडोदरा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तस्करांना पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे. दरम्यान विमल गुटखा चोरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या