JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Video : स्टंटबाजी पडली महागात; पोलिसांनी अशी शिक्षा केली आता कधीही बसता येणार नाही वाहनात

Video : स्टंटबाजी पडली महागात; पोलिसांनी अशी शिक्षा केली आता कधीही बसता येणार नाही वाहनात

कुख्यात गुन्हेगार झुबेर मौलाना याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो गाडीच्या बोनटवर बसून स्टंटबाजी करताना दिसत आहे. या व्हिडीओची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 11 जानेवारी : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कुख्यात गुन्हेगार झुबेर मौलाना याला अनोखी शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला दुचाकी किंवा चारचाकी चालवता येणार नाही, इतकंच नव्हे तर त्याला या गाड्यांमध्येही बसता येणार नाही. आता झुबेर मौलानाला फक्त सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांनाचा वापर करावा लागणार आहे. खरं तर, नुकताच झुबेरचा एक व्हिडिओ व्हायल झाला होता, ज्यामध्ये तो कारच्या बॉनेटवर बसून स्टंट करताना दिसत होता.    एक वर्षासाठी प्रतिबंध   त्यानंतर पोलीस आयुक्त मकरंद देउसकर यांनी कुख्यात गुंड झुबेर मौलानाला अनोखी शिक्षा दिली आहे. मकरंद देउसकर यांनी झुबेर मौलानावर पुढील 1 वर्षासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालविण्यास बंदी घातली आहे. एवढंच नाही तर आरोपीला दुचाकी किंवा चारचाकीमध्ये मागेही बसता येणार नाही. वाहनामागे बसण्यासही त्याच्यावर बंदी घातली आहे. त्याची शिक्षा संपेपर्यंत झुबेर फक्त सार्वजनिक वाहतूक बस ऑटो-रिक्षा वापरू शकेल. हेही वाचा :  सापाला मारल्याच्या गुन्ह्यात तरुण फरार; पोलिसांनी सापाचं पोस्टमार्टम केलं अन्… स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल   काही दिवसांपूर्वी हिस्ट्रीशीटर गुंड झुबेर मौलानाचा चालत्या कारच्या बॉनेटवर स्टंट करताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली होती. याप्रकरणी ऐशबाग टीआयचा अहवाल ऐकून झुबेरला शिक्षा सुनावण्यात आली होती.

…तर तुरुंगात रवानगी   शिक्षेदरम्यान आरोपी झुबेर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवताना आढळून आल्यास पोलीस त्याला थेट तुरुंगात पाठवतील, असंही पोलीस आयुक्त मकरंद देउसकर यांनी आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे. 10 जानेवारी 2023 पासून आरोपीला कोणतंही खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवता येणार नाही किंवा त्यात बसताही येणार नाही. एका वर्षाच्या कालावधीसाठी, झुबेर मौलाना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक बस किंवा अॅम्बुलन्स आणि तीन चाकी ऑटो रिक्षा वापरू शकेल. या कालावधीत तो खासगी वाहन चालवताना दिसला तर त्याला अटक करून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात येईल. आरोपी रस्ता सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच ही बाब गांभीर्याने घेत एक वर्षासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत, असं अतिरिक्त  डीसीपी श्रुतकीर्ती सोमवंशी यांनी सांगितलं. दरम्यान, झुबेर मौलानाला सुनावलेल्या या अनोख्या शिक्षेची सध्या भोपाळमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. नियमांचं उल्लंघन केल्याने झुबेरला आता वर्षभर केवळ सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांचाच वापर करता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या