JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / भंडाऱ्याला गेली अन् मिळाली आयुष्यभराची जखम, मुलीला मिळाल्या नरकयातना

भंडाऱ्याला गेली अन् मिळाली आयुष्यभराची जखम, मुलीला मिळाल्या नरकयातना

बुधवारी रात्री उशिरा हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भंडाऱ्यासाठी गेलेल्या 7 वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीनं बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात

आरोपी अजयने शाळेत येऊन पीडित मुलीला आपण तिचे नातेवाईक असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर ...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अयोध्या, 17 मार्च: रामाची नगरी असलेल्या अयोध्येत (Ayodhya) बुधवारी रात्री उशिरा हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भंडाऱ्यासाठी गेलेल्या 7 वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीनं बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे नराधमानं तिच्यावर बलात्कार करुन तिला गंभीर अवस्थेत सोडून पळ काढला. रडत रडत मुलगी बाहेर आली तेव्हा सर्वच लोक थक्क झाले. घाईघाईत आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना (Police)या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पीडित अल्पवयीन मुलीला उपचारासाठी श्री राम रुग्णालयात नेण्यात आलं. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला विभागीय रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर मुलीची प्रकृती आणखीन खालावल्यानं विभागीय रुग्णालयातून लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. IPL 2022 : आयपीएल स्पर्धेतील नव्या नियमांवर न्यूझीलंडच्या ऑलराऊंडरची टीका ऐन सणासुदीच्या काळात एका निष्पापावर बलात्कारासारख्या मोठ्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात लोकप्रतिनिधी आणि अयोध्येतील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी जवळपास लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मात्र अद्याप आरोपींचा पत्ता लागलेला नाही. भंडाऱ्याला गेली होती पीडिता अयोध्या कोतवालीपासून काही अंतरावर खाकी आखाड्यात एका व्यक्तीचा भंडारा कार्यक्रम होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं लोक आले होते. पीडित मुलगीही कुटुंबासह भंडाऱ्याला आली होती. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तीनं मुलीला फूस लावून खाकी आखाड्याच्या मागे असलेल्या झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

संबंधित बातम्या

बलात्कारानंतर निष्पाप मुलीची प्रकृती चिंताजनक झाली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या प्रकारानंतर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि इतर विभागांना पाचारण करून आरोपीचा शोध घेत आहेत आणि त्यांची ओळख पटवत आहेत. आजूबाजूच्या घरांमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे. पोलिसांच्या तपासाला वेग वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेश पांडे यांनी सांगितले की, कोतवाली अयोध्येतील खाकी आखाडा परिसरात भंडारा आयोजित करण्यात आला होता. एका मुलीचे वय 7 वर्षे असल्याचं सांगण्यात येत असून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पीडित मुलगी गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही. आरोपी अज्ञात आहे. या घटनेचा तपास सुरू असून लवकरच त्याचा खुलासा केला जाईल. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. निरपराधांचे मेडिकल केलं जात असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या