JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / विद्यार्थ्यांना तब्बल चार तास वर्गाबाहेर बसवलं, उरणमध्ये नामांकित शाळेचा संतापजनक प्रकार

विद्यार्थ्यांना तब्बल चार तास वर्गाबाहेर बसवलं, उरणमध्ये नामांकित शाळेचा संतापजनक प्रकार

फी भरली नाही म्हणून एका नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून चार तास ताटकळत ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, नवी मुंबई, 15 सप्टेंबर : उरणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फी भरली नाही म्हणून एका नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून चार तास ताटकळत ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. पालकांनी शाळा प्रशासनाला या प्रकाराबद्दल जाब विचारत धारेवर धरलं. शाळा प्रशासनाचं विद्यार्थ्यांसोबतच्या अशाप्रकारच्या वाईट वागणुकीवर शहरातील नागरिकांकडून टीका केली जात आहे. शाळा प्रशासनाला अद्दल घडवली पाहिजे, असं मत काही नागरिकांनी मांडलं आहे. उरणमधील यूईएस शाळेची फी भरली नसल्याने शिक्षण घेणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना तासंतास वर्गाबाहेर ताटकळत ठेवण्याचा निंदनीय प्रकार उरणमध्ये घडला आहे. या घटनेमुळे पालक वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. ( पहाटेच्या सुमारास घरात शिरले, बंदुक दाखवली, महिलांनाही मारहाण, अहमदनगरमध्ये सशस्त्र दरोडा ) उरण शहरात अनेक नामांकीत इंग्रजी माध्यम शाळांपैकी बोरी येथील यूईएस ही शाळा आहे. इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत गरीब-श्रीमंत अशा सर्वच स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत विद्यार्थ्यांना शाळेची फी भरली नसल्याने वर्गासमोर तासंतास ताटकळत ठेवल्याची धक्कादाय घटना घडली आहे. विद्यार्थी आज सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता शाळेत गेले होते. मात्र फी न भरल्याने त्यांना वर्गात न घेता वर्गाबाहेर बसविण्यात आले. जवळपास 4 तास शाळा वर्गाबाहेर ठेवल्याने पालकांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले. 5 वी ते 10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या एकूण 18 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या