JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / उल्हासनगरची डॉक्टर निघाली दलाल, नवजात बाळाचा रेटही ठरवला!

उल्हासनगरची डॉक्टर निघाली दलाल, नवजात बाळाचा रेटही ठरवला!

उल्हासनगरमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिला डॉक्टर चक्क आपल्याच हॉस्पिटलमध्ये नवजात बाळांची लाखो रुपयांना विक्री करत होती.

जाहिरात

उल्हासनगरमधली डॉक्टरच निघाली दलाल, लहान बाळाचा सौदा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गणेश गायकवाड, प्रतिनिधी उल्हासनगर, 18 मे : उल्हासनगरमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिला डॉक्टर चक्क आपल्याच हॉस्पिटलमध्ये नवजात बाळांची लाखो रुपयांना विक्री करत होती. विक्री करणारं रॅकेट हे राज्यातील आणि राज्या बाहेरचं असून 22 दिवसाच्या बाळाची विक्री करत असताना क्राइम ब्रांचच्या पथकाने पाच जणांना रंगेहात अटक केली आहे. दरम्यान या डॉक्टर महिलेने आपल्या टोळीच्या माध्यमातून असंख्य बाळांची विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 मधील महालक्ष्मी नर्सिंग होम या हॉस्पिटलची मालकीण असलेली डॉक्टर चित्रा चैननी नवजात बाळांची लाखो रुपयांना विक्री करायची. सामाजिक कार्यकर्त्यांना याची माहिती होताच त्यांनी डमी ग्राहक तयार केला. ज्योती मोरे यांनी आपल्याला दोन मुली असून एक मुलगा हवा आहे, असं डॉक्टर चैनानीला सांगितलं. तब्बल तीन महिने डॉक्टर ज्योतीला मोबाईलवर वेगवेगळ्या बाळांचे फोटो पाठवायची. मात्र बुधवारी तिने एका २२ दिवसाच्या बाळाचा फोटो पाठवून हे बाळ विक्रीसाठी आल्याचे सांगितलं. मात्र यासाठी 7 लाख रुपये लागतील असं देखील तिने सांगितलं. ज्योतीने आपले सहकारी सान्या हिंदुजा हिला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर क्राइम ब्रांच ठाणे यांना याची माहिती देण्यात आली. आणि 7 लाख रुपयांमध्ये बाळाची विक्री होत असताना क्राइम ब्रांचच्या पथकाने नवजात बाळ विक्रीचे हे रॅकेट उध्वस्त केलं. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात डॉक्टर चित्रा चैनानी हॉस्पिटलमधील या रॅकेटची सदस्य, बाळाची आई आणि बेळगावहून आलेल्या अशा एकूण 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील विविध शहरं आणि बेळगावात या टोळीचे सक्रिय सदस्य आहेत. नाशिकची रहिवासी असलेल्या आणि 22 दिवसांपूर्वी प्रसूती झालेल्या एका महिलेला पैशांचं आमिष दाखवून तिचं बाळ उल्हासनगर मध्ये बुधवारी विक्रीला आणलं गेलं होतं आणि त्याच वेळेस या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. विशेष म्हणजे या डॉक्टर महिलेकडून हे मोठं रॅकेट गेल्या अनेक वर्षांपासून चालवलं जात असल्याचा देखील संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी याआधी देखील तिने किती बाळांची विक्री केली आहे? यासाठी एका महिला अधिकाऱ्यासह 10 जणांचं विशेष पथक या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलं आहे, त्यामुळे तापसनंतर आणखी अनेक धक्कादायक प्रकरणं उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या