JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Shootout at कलकत्ता : Most Wanted गुडांचा एनकांउटरमध्ये खात्मा, पोलिसांच्या हत्येप्रकरणात होते फरार

Shootout at कलकत्ता : Most Wanted गुडांचा एनकांउटरमध्ये खात्मा, पोलिसांच्या हत्येप्रकरणात होते फरार

बक्षीस जाहीर असलेले खतरनाक गुंड जयपाल भूल्लर आणि जसप्रीत जस्सी या दोघांचा पोलिसांनी एनकांउटरमध्ये (police encounter) खात्मा केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 09 जून : पंजाबमधील दोन पोलिसांच्या हत्येत फरार असलेले मुख्य आरोपी आणि ज्यांच्यावर बक्षीस जाहीर असलेले खतरनाक गुंड जयपाल भूल्लर आणि जसप्रीत जस्सी या दोघांचा पोलिसांनी एनकांउटरमध्ये (police encounter) खात्मा केला. हे दोन्ही गुंड शापूरजी निवासस्थानी लपले असल्याची माहिती स्पेशल टास्क फोर्सला मिळाली होती. पोलीस माहिती घेऊन गुप्तपणे कारवाई करण्यासाठी पोहचले. स्पेशल टास्क फोर्स (STF) छापा टाकला तेव्हा दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. ज्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला. यानंतर एसटीएफकडून प्रतिकात्मक गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये दोन्ही दरोडेखोरांचा मृत्यू झाला. शापूरजी हाऊसिंगच्या पाचव्या मजल्याच्या फ्लॅट नंबर बी 154 मध्ये काही शस्त्र विक्रेते लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी येथे छापा टाकला. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस पोहोचले तेव्हा त्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरू केला. पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात झालेल्या गोळीबारात हे दोन्ही खरतनाक गुंड ठार झाले. या दोघांवर पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली येथे तब्बल 50 हून (Most Wanted Criminals) अधिक गुन्हे दाखल आहेत. हे वाचा -  ठाणे उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; मुसळधार पावसात समुद्रातून मार्ग काढत केली कामगिरी सूत्रांच्या माहितीनुसार, नुकताच एसटीएफने बीरभूम येथे शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर पोलिसांना अशी माहिती मिळाली की, टोळीचे काही सदस्य कोलकातामध्ये लपले आहेत. याबाबत पंजाब पोलिसांच्या सहकार्याने ते कोठे लपले आहेत, याची माहिती घेण्यात आली. हे वाचा -  ‘माझ्या अकाउंटमधून त्याने पैसे काढले, दागिनेही घेतले’; लग्न मोडताच नुसरतचे निखिल जैनवर गंभीर आरोप एनकांउटरच्या घटनेनंतर मोठ्या संख्येनं पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. बिधाननगर आयुक्त आणि एसटीएफचे एडीजीही घटनास्थळी उपस्थित आहेत. घटनास्थळी कोम्बिंग ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मारले गेलेले हे दोन गुंड केवळ बेकायदा शस्त्रास्त्रांशीच संबंधित नव्हते तर सीमेपलिकडून होणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यापारातही संबंधित होते. जयपालवर पंजाब पोलिसांनी 10 लाख रुपये आणि जसप्रीतवर 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. दोन्ही दरोडेखोरांच्या ताब्यातून पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या