JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / दिल्ली बलात्कार प्रकरणात अफवांचं पीक; तिघांवर गुन्हे, ब्रिटन आणि अमेरिकेसह कॅनडातूनही अपप्रचार

दिल्ली बलात्कार प्रकरणात अफवांचं पीक; तिघांवर गुन्हे, ब्रिटन आणि अमेरिकेसह कॅनडातूनही अपप्रचार

दिल्ली बलात्कार प्रकरणात चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत असून पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेढ निर्माण कऱण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. इतर देशांतील ट्विटर अकाउंटवरूनही गैरसमज पसरवले जात आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: दिल्लीत झालेल्या बलात्काराला (Delhi Rape) धार्मिक रंग (Communal spin) देऊन तेढ (Haterate) पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं गेल्या काही दिवसांतील घटनांवरील सिद्ध होऊ लागलं आहे. कॅनडा, अमेरिका आणि युनायटेड किंगडममधूनही (Canada, US and UK) गैरसमज पसरवणारे ट्विट केले जात असल्याचं दिसून आलं आहे. दिल्लीतील तरुणीवर झालेला बलात्कार आणि मृत्यू याबाबत वाटेल त्या अफवा पसरवल्या जात असून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं पोलिसांचं निरीक्षण आहे. आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकार वाढत चालले असून भारतासोबत इतर देशांतील ट्विटर हँडलवरूनही असाच अपप्रचार सुरू झाल्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचं मोठं आव्हान यंत्रणांसमोर उभं ठाकलं आहे. काय आहे प्रकरण? 26 जानेवारी रोजी दिल्लीत 20 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत होतं. ही तरुणी शीख धर्मीय असून आरोपी हिंदू असल्याची अफवा काही ट्विटर हँडल्सवरून पसरवण्यात येत होती. वस्तुस्थिती तशी नसताना जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यामागे आगामी विधानसभा निवडणुका हेच कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. काही ट्विटर हँडल्स आणि यूट्यूब चॅनलचा वापर करून जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून आलं आहे. वस्तुस्थिती वेगळी वास्तविक, आरोपी आणि तरुणी हे दोघंही एकाच धर्माचे होते, असं पोलिसांनी म्हटलं आहे. काही ट्विटर हँडल आणि यूट्यूब चॅनलवरून या घटनेतील पीडितेचं नावही जाहीर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अशा प्रसंगांमध्ये पीडितेचं नाव गुप्त ठेवण्याचे संकेत अनेकांनी मोडल्याचं दिसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. भारतातील काही ट्विटर खात्यांना नोटिसा देण्यात आल्या असून असे ट्विट रोखण्यात यावेत, अशी सूचना माहिती आणि प्रसारण खात्याने ट्विटरला केली आहे. हे वाचा -

तिघांविरुद्ध गुन्हा खोटी माहिती पसरवणे, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे यासारख्या आरोपांखाली तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र भारताबाहेरूनही हा अपप्रचार सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनाला आलं आहे. युके, अमेरिका आणि कॅनडातील काही सोशल मीडिया अकाउंटवरूनही गैरसमज पसरवले जात असल्याचं दिसून आलं आहे. या घटनेबाबत जर कुणी गैरसमज पसरवण्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या