प्रेम, धर्मांतर अन् धोका, 12 वर्षानंतर ट्रिपल तलाक
प्रशांत कुमार, प्रतिनिधी 6 जून : प्रेमानंतर धर्मांतर मग निकाह आणि नंतर धोका दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धर्मांतर करून 12 वर्षांपूर्वी चांद नावाच्या व्यक्तीने पीडित मुलीशी लग्न केलं. लग्नानंतर 12 वर्षांमध्ये दोघांना 4 मुलं झाली, यानंतर आता चांदने ट्रिपल तलाक देऊन दुसरं लग्न केलं. न्याय मिळवण्यासाठी पीडित महिला दारोदार फिरत आहे, पण अजूनही तिला न्याय मिळालेला नाही. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये ही घटना घडली आहे. गाझियाबादमध्ये राहणारी पूनम दिल्लीतल्या ब्युटी पार्लरमध्ये मेकअप आर्टिस्ट होती. बुलंदशहरमध्ये राहणारा चांद ऑटो चालवायचा. पार्लरच्या स्टाफला चांद त्याच्या ऑटोमधून रोज सोडायला जायचा, याचवेळी चांद आणि पूनम प्रेमात पडले. चांदने पूनमचं धर्मांतर करून तिचं नाव निशा ठेवलं आणि दोघांनी निकाह केला. निकाह केल्यानंतर 12 वर्षांनी निशाला 4 मुलं आहेत, पण चांदने निशाला ट्रिपल तलाक दिला. तीन तलाकनंतर निशा चार मुलांसोबत पोलीस स्टेशनच्या चकरा मारत आहे, पण अजूनही तिला न्याय मिळाला नाही. बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या युवकाने 12 वर्षांपूर्वी माझं धर्मांतर केलं आणि माझ्यासोबत निकाह केला. आता मला 4 मुलं आहेत आणि पतीने तीन तलाक दिला आहे, त्याने दुसरं लग्नही केलं आहे. न्याय मिळण्यासाठी मी अधिकाऱ्यांकडे जात आहे, पण अजूनही मदत मिळाली नाही, असं पीडित महिलेनं सांगितलं आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीची चौकशी केली जात आहे. जर कुणी दोषी असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं एसपी सिटी सुरेंद्रनाथ तिवारी यांनी सांगितलं आहे.