JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / आदिवासी तरुणाला मारहाण, अंगावर लघवीही केली; महिनाभराने घटना उघडकीस

आदिवासी तरुणाला मारहाण, अंगावर लघवीही केली; महिनाभराने घटना उघडकीस

नवीनने त्यांना सोडण्याची विनंती केली; पण त्यांनी मारहाण सुरूच ठेवली.

जाहिरात

घटनास्थळावरचा फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ओंगोल, 19 जुलै : एका आदिवासी तरुणावर नऊ जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्या वेळी हल्लेखोरांनी या तरुणाच्या अंगावर लघवी करून त्याच्या तोंडात प्रायव्हेट पार्ट घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना एक महिन्यापूर्वी घडली. परंतु, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ही घटना उघडकीस आली. आंध्र प्रदेशातल्या ओंगोल इथल्या केआयएमएस हॉस्पिटलच्या मागे असलेल्या निर्जन ठिकाणी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण नवीन हा आदिवासी आहे. तो आणि मान्ने अंजनेयुलू उर्फ अंजी हे बालपणापासून गुन्हेगार आहेत. या दोघांवर घरफोडीचे 50 गुन्हे नोंद आहेत. काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. अंजीने महिनाभरापूर्वी नवीनला केआयएमएस हॉस्पिटलच्या मागे असलेल्या निर्जन ठिकाणी दारू पिण्यासाठी बोलवले. नवीन जेव्हा त्याठिकाणी पोहोचला तेव्हा तिथं अंजीव्यतिरिक्त ओंगोलमधल्या इस्लामपेट आणि गोपाळनगरमधील आणि बापटला जिल्ह्यातल्या वेतापलेम इथले आठ तरुण होते.

तिथे ते एकत्र दारू प्यायले आणि त्यांची पार्टी सुरू असताना नवीन आणि अंजी यांच्यात जुन्या वादावरून शाब्दिक चकमक झाली. वाद सुरू असताना प्लॅनिंगनुसार नऊ जणांनी अचानक नवीनवर हल्ला केला. नवीनने त्यांना सोडण्याची विनंती केली; पण त्यांनी मारहाण सुरूच ठेवली. त्यांनी नवीनला शरीरातून रक्तस्राव होईपर्यंत मारलं. आरोपीने त्याच्या अंगावर लघवी केली आणि त्याला लघवी पिण्यास भाग पाडले. त्यांनी त्यांचे प्रायव्हेट पार्ट नवीनच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या संपूर्ण घटनेचे त्यांच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका आरोपीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला होता. या प्रकरणी पीडित व्यक्तीने एका महिन्यापूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शारीरिक हल्ला आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपींची चौकशी किंवा अटक करण्याचा प्रयत्न केला नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ही घटना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आणि सतर्क झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. या प्रकरणातला मुख्य आरोपी फरार असून, पोलिसांनी नऊपैकी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या