JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सोलापुरात ट्राफिक पोलिसाचं धक्कादायक कृत्य; कॅमेऱ्यात कैद झालं ते दृश्य, VIDEO

सोलापुरात ट्राफिक पोलिसाचं धक्कादायक कृत्य; कॅमेऱ्यात कैद झालं ते दृश्य, VIDEO

सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून दोन ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याची घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

जाहिरात

ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेताना कॅमेऱ्यात कैद

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रीतम पंडित, सोलापूर 10 ऑक्टोबर : सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून दोन ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याची घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलीस चिरीमिरी घेत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आधी मटण खाऊ घातलं, दारू पाजली; राजेश्वरने मित्राकडून अशी केली वसुली सोलापूर शहरात आधीच वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. शहरातील ट्राफिक विभाग वाहतुकीबाबत कोणतेही धोरण राबवत नाही. शहरातील प्रत्येक चौकात ट्राफिक पोलीस वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत असतात. अनेकदा लोक नियमाप्रमाणे दंड भरण्याऐवजी चिरीमिरी देऊन सुटण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका वाहन चालकाला तिथे उपस्थित असलेल्या दोन ट्राफिक पोलिसांनी थांबविले. नियमांचा भंग केल्याप्रकरणी चलनाची माहिती दिली. मात्र, शेवटी चिरीमिरी घेऊन या वाहन चालकाला सोडून देण्यात आलं. आपल्याला कोणी पाहू नये यासाठी हात मागे घेत या पोलिसांनी चिरमिरीची रक्कम स्वीकारली.

संबंधित बातम्या

हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात रेकॉर्ड केला. ट्राफिक पोलीस अशाप्रकारे चिरीमिरी घेत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बनावट सह्या करून 46 लाखाची फसवणूक, असा उघड झाला ठाण्यातील विमा कंपनीच्या महिला मॅनेजरचा डाव आधी वाहतुकीचे नियम मोडले तर ट्राफीक पोलीस पावती फाडायचे. त्यासाठी रोख रक्कम घेतली जायची. हे पैसे घेताना चिरीमिरी देऊन वाहनचालक मोठ्या दंडातून सुटका करुन घ्यायचे. मात्र, यामुळे मोठा भ्रष्टाचार होत होता. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक विभागात मोठे बदल केले आणि वाहतूक विभागाचा कारभार ऑनलाईन झाला. मग डिजीटल स्वरुपात ग्राहकाच्या घरी पावती जायला लागली, पैसेही थेट वाहतूक विभागाच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र अजूनही ट्राफिक विभागातील काहीजण चिरीमिरी घेत असल्याचं समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या