अर्जुन अरविंद, कोटा, 10 फेब्रुवारी: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) राजस्थानमधील जिल्हा संघचालकाला गोळ्या घातल्या आहेत. या हल्ल्यात जिल्हा संघचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोटा येथील महाराव भीम सिंह रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करुन दोघांना पकडलं आहे. तर घटनास्थळावरुन पळूवन जाण्यात यशस्वी झालेल्या आरोपीच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणाच पुढील तपास सुरू आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जिल्हा संघचालकाचं नाव दीपक शहा असून ते दगडाचे व्यावसायिकही आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात दीपक शहा यांचा रामगंजमंडी परिसरातील काही सराईत गुन्हेगारांशी वाद झाला होता. त्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील नोंदवला गेला आहे. असं असताना मंगळवारी दीपक शहा प्राणघातक हल्ला झाला आहे, त्यामुळे या दोन घटना एकमेकांशी जोडून तपास केला जात आहे. (हे वाचा- ‘शिवडे i am sorry’नंतर आता समोर आले नवे पोस्टर, यावेळी तरूणीनं लिहिलं असं काही.. ) ज्यावेळी दीपक शाह यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला, त्यावेळी ते शहराच्या शहाजी चौकात कामानिमित्त आले होते. त्याचवेळी मोटरसायकलवरुन आलेल्या तीन हल्लेखोरांनी शहा यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला. या हल्ल्यात शहा यांच्या दोन्ही पायाला गोळ्या लागल्या आहेत. हल्ल्यानंतर त्यांना लगेच राजगंजमंडी येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना कोटा येथील महाराव भीम सिंह रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. (हे वाचा- ट्रकच्या चाकाखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू, हादरवून टाकणारा CCTV VIDEO ) घटनेची माहिती मिळताच रामगंजमंडी शहरातील पोलीस ठाण्याबाहेर व्यापारी आणि आरएसएसचे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. जमावाने पोलीस स्टेशनला घेराव घालून निदर्शनेही केली आहेत. शहरात रात्रभर तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर परिस्थिती लक्षात घेता रामगंजमंडी पोलिसांनी सुरक्षा वाढवली होती. संतप्त व्यापाऱ्यांनी हल्ल्याच्या निषेर्धात बुधवारी शहर बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. अनेक बीजेपी आमदारांनी दीपक शाह यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. जखमी दीपक शाह यांनी सांगितलं की हा हल्ला मकसूद पाया यांच्या टोळीने केला आहे. त्यांना हफ्ते घेण्यापासून रोखल्याने त्यांच्या हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.