JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / एकाच घरात आढळले 3 मृतदेह; गेल्या वर्षी पतीचा मृत्यू, आता तिघांनी संपवलं जीवन

एकाच घरात आढळले 3 मृतदेह; गेल्या वर्षी पतीचा मृत्यू, आता तिघांनी संपवलं जीवन

एकाच घरात कुटुंबाच्या तीन सदस्यांचा मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 21 मे : दिल्लीच्या (New Delhi) वसंत विहार भागात एकाच घरात कुटुंबाच्या तीन सदस्यांचा मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ उडाली आहे. तणावग्रस्त जीवनामुळे घरातील महिला आणि तिच्या दोन मुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या आत गॅस सिलिंडर ओपन केलं होतं आणि आतून दारं आणि खिडक्या बंद केल्या होत्या. तिघांचाही ( flat was locked from inside ) श्वास गुदमरल्यामुळे (died due to suffocation) मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. वसंत विहार स्थित वसंत अपार्टमेंटच्या हाउस नंबर- 207 (House no.207, Vasant Apartment, Vasant Vihar) येथून हा प्रकार समोर आला आहे. मंजू, अंशिका आणि अंकु अशी मृतांची नावं आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मृत मंजूच्या पतीची कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला होता. यानंतर त्यांची पत्नी मंजू तणावात होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तिची प्रकृती ठीक नव्हती. (Manju was bed ridden due to illness)मानसिक तणावातून महिलेसह मुलांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या