JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / वकिलाची दबंगगिरी; स्कूटरवरूनच Live लिंकद्वारे सुनावणीच्या वाद-विवादाला सुरुवात, न्यायमूर्तींकडून कानउघडणी

वकिलाची दबंगगिरी; स्कूटरवरूनच Live लिंकद्वारे सुनावणीच्या वाद-विवादाला सुरुवात, न्यायमूर्तींकडून कानउघडणी

सध्या सर्वत्र ऑनलाइन व्यवहार सुरू आहे. शाळा, महाविद्यालयांबरोबरच हायकोर्टातील सुनावणीदेखील ऑनलाइन होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इलाहाबाद, 27 जून : सध्या सर्वत्र ऑनलाइन व्यवहार सुरू आहे. शाळा, महाविद्यालयांबरोबरच हायकोर्टातील सुनावणीदेखील ऑनलाइन होत आहे. 25 जून रोजी अशीच एक घटना समोर आली आहे. इलाहाबाद हायकोर्टात सुनावणीच्या व्हर्च्युअल सुनावणीबाबत अनेकदा विचित्र घटना समोर येतात. 25 जून रोजी अशीच एक घडना घडली होती. लाइव्ह लिंकची वाट न पाहणाऱ्या वकिलाला याचा फटका सहन करावा लागला. कोर्टाने स्कूटरवरून जाताना केसबाबत वादविवाद करणाऱ्या वकिलाची कानउघडणी केली आणि भविष्यात असं न करण्याचा सल्ला दिला. वकिल घराबाहेर असल्या कारणाने सुनावणी 12 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. 25 जून रोजी न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता आणि न्यायमूर्ती एस ए एच रिजवी यांच्या न्यायालयात खुशबू देवीची केस होती. ज्यावेळी सुनावणीची व्हिडीओ लिंक वकिलाला पाठवली तेव्हा तो स्कूटर चालवत होता. त्याने स्कूटरवरच लिंकवर क्लिक करून आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली. ज्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. आणि केसची सुनावणी करण्यास नकार दिला. हे ही वाचा- धक्कादायक! घरात सुरू होता रक्ताचा काळा बाजार; दारूड्यांचं रक्त घेऊन सप्लाय यावेळी मात्र वकिलाची चांगलीच कानउघडणी करण्यात आली. तर दुसरीकडे वकिलाचं म्हणणँ आहे की, नेहमीच हायकोर्ट प्रशासनाकडून लिंक कधी येणार याबद्दल सूचना दिली जात नाही. वकील बराच वेळ यासाठी वाट पाहत असतात. एकदा एक वकील गावी गेले होते. कोर्टाने लिंक पाठवली. त्यामुळे वकील शेतातून वाद-विवाद करीत होते. त्यामुळे वकिलांकडून या रचनेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या