कलकत्ता, 30 जानेवारी : पश्चिम बंगालमधील (West Bengal News) हावडामध्ये रविवारी अत्यंत हृदयद्रावक घटना समोर (Shocking News) आली आहे. हावडामधील शिबपूर (Howrah Shibpur) भागात तब्बल 10 दिवसांपर्यंत आई ही आपल्या मुलीच्या कुजलेल्या मृतदेहासह जमिनीवर पडून राहिली. रविवारी सकाळी या घटनेनंतर हावडा परिसरात खळबळ उडाली. याबाबत माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेचं नाव श्यामली मलिक (45) असल्याचं समोर आलं आहे. तिची आई दीप्ती मलिक (60) आहे. वृद्ध महिला घरात आपल्या मुलीसह राहत होती. ते दोघेही गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. घराजवळ त्यांचे नातेवाईक आहेत. मात्र कोणीच त्यांची विचारपूस केली नाही. घरात प्रवेश करताना घरभर दुर्गंधी पसरली होती. तर श्यामलीचा कुजलेला मृतदेह तिच्या आईशेजारी पडून होता. आई निश्चलपणे बसून होती. सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी दिला. घरात दोघीच राहत होत्या.. वृद्ध महिलेने सांगितलं की, तिचा पती एका खासगी कंपनीत काम करीत होता. तीन वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर तिची काळजी करणारं कोणीच नाही. श्यामली देवीचा पुतण्या शुभदीप कधी कधी घरी येत होता. तो कधी कधी जेवण घेऊन येत होता. रविवारी तो पुन्हा आला होता. मात्र दोघींवर उपचार का करण्यात आले नाही याबाबत काहीच माहिती तो देऊ शकला नाही. शुभदीपने हे मान्य केलं ही त्यांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष झालं आहे. हे ही वाचा- Shocking! मैत्रिणीने दिला दगा; पोलीस अधिकाऱ्याने हॉटेलमध्ये केली आत्महत्या स्थानिकांनी सांगितलं, त्या दोघींपैकी कोणीच घराबाहेर जात नव्हते. कधी कधी त्यांचे नातेवाईक घरी येत होते. तेच जेवण घेऊन येत होते. तसं पाहता श्यामली देवीजवळ जमिनीचा तुकडा आहे. तिच्या मृत्यूनंतर ती जमिन नातेवाईकांना मिळणार होती. यामुळे कदाचित त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं असावं. हा सवाल उपस्थित केला जात आहे.