भोपाळ, 23 नोव्हेंबर: सरकारी शाळेच्या (Teacher sends porn video in whats app group of students and parents) शिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी (What’s app group of school students) शाळेनं तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अचानक शिक्षकांनी एक मेसेज टाकला. जेव्हा पालकांनी तो मेसेज पाहिला आणि त्यातील लिंक क्लिक केली, तेव्हा सरळ पॉर्न फिल्म दिसायला सुरुवात झाली. त्यामुळे संतापलेल्या (Parents file police complaint) पालकांनी थेट पोलिसांत धाव घेतली. अशी घडली घटना मध्यप्रदेशातील रिवातील सरकारी शाळेत शिकवणारे शिक्षक कृपाशंकर चतुर्वेदी यांनी शाळेच्या एका ग्रुपवर पॉर्न व्हिडिओ पोस्ट केला. या सरकारी ग्रुपमध्ये 28 शाळांमधील 180 विद्यार्थी, 65 महिला शिक्षक आणि मुलांचे आईवडील यांचा समावेश आहे. या ग्रुपवर ज्या क्षणी पॉर्न व्हिडिओचा मेसेज पडला, त्यानंतर जोरदार खळबळ उडाली. पालकांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेत या प्रकाराची फिर्याद दिली आहे. शिक्षकांनी दिलं भलतंच कारण आपली दृष्टी कमकुवत असून आपल्याला चष्मा असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. अनेकदा चष्मा न लावता मोबाईल हाताळल्यामुळे अशा चुका होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपली चूक ही गंभीर असल्याचं मान्य करत त्यांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांची क्षमायाचना केली आहे. भविष्यात असा प्रकार पुन्हा घडणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. हे वाचा - संतापजनक! पत्नी रुसल्याचा आला राग, काठीने मारून केला खून पालकांनी शेअर केले अनुभव यापूर्वीदेखील याच शिक्षकांनी असेच प्रकार केल्याचे अनुभव पालकांनी शेअर केले आहेत. मागच्या वेळेला शाळेची बदनामी होऊ नये, म्हणून घडल्या प्रकाराची कुणीही वाच्यता केली नव्हती. मात्र त्याचा गैरफायदा घेत शिक्षक मुद्दाम असे प्रकार करत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे यावेळी शिक्षकांना माफी न देता त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांमधून जोर धरत आहे.