JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / IIT च्या अभ्यासाने घेतला विद्यार्थ्याचा जीव; 9 व्या मजल्यावरुन मारली उडी, आईला धक्का!

IIT च्या अभ्यासाने घेतला विद्यार्थ्याचा जीव; 9 व्या मजल्यावरुन मारली उडी, आईला धक्का!

आई-वडील मुलांवर अभ्यासाचं इतकं प्रेशर आणतात की, त्यातून भयंकर गोष्टी घडत असल्याचं वारंवार समोर येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोटा, 15 ऑक्टोबर : एज्युकेशन सिटीमध्ये अभ्यासाच्या तणावाखाली आलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना थांबत नसल्याचं दिसून येत आहे. अशीच एक घटना कोटा येथून आली आहे. IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी देशभरातील विद्यार्थी कोटामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. अभ्यासाच्या तणावाखाली 16 वर्षीय मुलीने इमारतीच्या 9 व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चा जीव घेतला. 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा इतक्या जोरात जमिनीवर पडला की, तेथे खड्डा झाला. आजूबाजूला उभ्या असलेल्यांना तातडीने मुलाला उचललं आणि रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. हा विद्यार्थी IIT चा अभ्यास करीत होता. त्याच त्याला टेन्शन होतं. सातवीतील विद्यार्थीनीने घेतली शाळेच्या छतावरुन उडी; मुंबईतील खळबळजनक घटना अनेक दिवसांपासून टेन्शनमध्ये होता… मिळालेल्या माहितीनुसार, कलकत्ता निवासी स्वर्णा गेल्या 1 वर्षांपासून कोटातील जवाहर नगर भागात आपल्या आईसह एका इमारतीत भाड्याने राहत होता. तो कोटामधील एका खासगी कोचिंगचा विद्यार्थी होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो अभ्यासावरुन टेन्शन घेत होता. हे त्याने आपली आई आणि शिक्षकांनाही सांगितलं होतं. या घटनेनंतर आईला जबर धक्का बसला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. कोटा शहरात खळबळ, लाखो मुलांमध्ये भीती… एज्युकेशन सिटी कोटा गेल्या काही वर्षात एज्युकेशन हब तयार झाली आहे. वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येत असतात. काही दिवसांपूर्वीही एका विद्यार्थ्याने स्वत:चा जीव घेतला होता. आता पुन्हा एका एका विद्यार्थ्याने 9 व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चा जीव घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या