दिल्ली, 16 फेब्रुवारी : आत्महत्याच्या (Suicide) प्रकरणांचा बारकाईने अभ्यास केला तर अधिकतर प्रकरणात (Family Reason) कौटुंबिक कारणं समोर आली आहेत. कुटुंबातून वाढलेला तणाव इतका जास्त होतो की, लोक आपलं आयुष्यचं संपवतात. अशीच एक घटना दिल्लीतून समोर (West Delhi) आली आहे. येथे एका आईने मुलांमुळे आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय महिलेने (50 Year Old Women) एका नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. घरात सतत वाद.. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ख्याला भागातील (Khayala Area) 50 वर्षीय महिलेने नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येमागे तणावाचं कारण समोर आलं आहे, महिलेला दोन मुलं आहेत. मात्र दोघेही बेरोजगार आहेत. इतकच नाही तर दोघांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणं होत होती. हे ही वाचा- डोंबिवली : पत्नीला शोधण्यासाठी पोलिसात तक्रार; शेजारच्यांना सोफ्यातच दिसलं भयंकर यामुळे दररोजच्या भांडणाला वैतागून महिलेने आत्महत्या केली. मृत महिलेचं नाव निर्मला आहे. ती शिवणकाम करून घर चालवित होती. मात्र तिची मुलं काहीच काम करीत नव्हते. त्यामुळे घरात आर्थिक चणचण होती. यामुळे महिला मानसिकदृष्ट्या तणावात होती. मंगळवारी सकाळी साडे सात वाजता निर्मला यांनी नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. मात्र आत्महत्या हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही. तुमच्या आजूबाजूला मानसिक तणावातील व्यक्ती असतील तर त्यांना योग्य मार्गदर्शन करा. त्यांना एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाणं फायद्याचं ठरेल. त्यासाठी स्थानिक प्रशासानाची मदत घेऊ शकता.