JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Shraddha Murder Case : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे ठेवले; आफताबने ठेवलाय हिशोब, धक्कादायक माहिती उघड

Shraddha Murder Case : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे ठेवले; आफताबने ठेवलाय हिशोब, धक्कादायक माहिती उघड

श्रद्धा वालकर खून प्रकरणात जसजसे दिवस पुढे जातील तसतसे मोठे खुलासा बाहेर येत आहेत. आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर खून प्रकरणात जसजसे दिवस पुढे जातील तसतसे मोठे खुलासा बाहेर येत आहेत. आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आरोपी आफताब अमीन पूनावाला श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा हिशेब ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे. सहा महिन्यांच्या जुन्या खून प्रकरणाची उकल करताना, दिल्ली पोलिसांनी आफताबला श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकड्यांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटक केली. चौकशीत असे समोर आले आहे की, आफताब श्रद्धाचे किती तुकडे ठेवले होते याची रफ चिठ्ठी लिहायचा.

आफताब आणि श्रद्धाच्या खून प्रकरणी तपास सुरू असताना पोलिसांना याचा उलगडा झाला आहे. त्यांने केलेल्या अशा प्लॅनचा आधार घेत पोलीस उर्वरित शरीराच्या अवयवांचा शोध घेत आहेत. या रफ प्लॅनद्वारे, 150 हून अधिक पोलीस गुरुग्राम आणि मेहरौलीच्या जंगलाच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध घेत आहेत. त्याने केलेल्या नोटचा दिल्ली पोलिसांनी आपल्या रिमांड अर्जातही उल्लेख केला आहे.

हे ही वाचा :  श्रद्धाची हत्या गळा दाबून नाही तर.. दिल्ली पोलिसांची नवीन थिअरी, घटनेची मोठी अपडेट

संबंधित बातम्या

गुन्ह्याच्या ठिकाणाहून जप्त केलेल्या साइट प्लॅनबाबत, पोलिसांचे म्हणणे आहे की, आम्हाला त्याच्या प्लॅनद्वारे खून प्रकरणाच्या तपासात आणि मृतदेहाचे तुकडे शोधण्यात मदत होऊ शकते. आफताबने श्रद्धाचा मृतदेह घराच्या आत ठेवलेल्या ठिकाणांचा प्लॅनही त्याने तयार केला होता, ज्यामुळे श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्यात मदत होण्याची शक्यता आहे.

जाहिरात

दरम्यान, आफताबला रिमांडवर घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद केला. आरोपी आफताबच्या गुन्ह्यानुसार श्रद्धाच्या शरीराचे अनेक भाग जंगलातून जप्त करण्यात आले आहेत. तसेच आफताबच्या सूचनेनुसार 20 नोव्हेंबरला श्रद्धाचा जबडा जंगलातून जप्त करण्यात आला होता.

हे ही वाचा :  प्रियकराची पत्नी ठरत होती नात्यात अडसर, रागात पुण्यातील प्रेयसीने केलं भयानक कांड

आफताबच्या पोलीस कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ करण्याची मागणी करत अधिकारी म्हणाले की, आफताबच्या सांगण्यावरून हत्येसाठी वापरलेले हत्यार आणि शरीराच्या इतर काही अवयवांचा भाग शोधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रिमांडची चौकशी करण्याची गरज आहे. परिस्थितीजन्य पुरावे शोधण्यासाठी आणि या प्रकरणातील सर्व दुवे जोडण्यासाठी आफताबची आणखी चौकशी करणे आवश्यक आहे, असेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या