JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पर्दाफाश! विम्याच्या आडून सुरू होतं HIGH PROFILE सेक्स रॅकेट, ग्राहकांना अशी घालायचे गळ

पर्दाफाश! विम्याच्या आडून सुरू होतं HIGH PROFILE सेक्स रॅकेट, ग्राहकांना अशी घालायचे गळ

विमा पॉलिसीच्या आडून सेक्स (Sex racket in the name of insurance policy business) रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुरादाबाद, 26 ऑक्टोबर : विमा पॉलिसीच्या आडून सेक्स (Sex racket in the name of insurance policy business) रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना (Along with 2 women 5 arrested) अटक केली आहे. अगोदर विमा पॉलिसी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं जायचं. जे प्रतिसाद द्यायचे नाहीत, त्यांना सेक्स सर्व्हिस पुरवण्याचं अमिष दाखवलं जायचं. अशा प्रकाराने अनेक नागरिकांना या टोळीनं जाळ्यात ओढलं होतं. विम्याच्या आडून सेक्सचा बाजार उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राहणाऱ्या दोन महिलांनी विमा विकायला सुरुवात केली होती. मात्र त्यांच्याकडून कुणीच विमा विकत घेत नव्हतं. सहा महिन्यांत केवळ दोन जणांचे विमे उतरवण्यात त्यांना यश आलं होतं. अधिकाधिक आणि लवकरात लवकर विमे उतरवण्यासाठी कंपनीकडून त्यांच्यावर दबाव येत होता. त्यानंतर या महिलांनी ग्राहकांना सेक्स सर्व्हिस ऑफर करण्याचं ठरवलं. त्यांच्या या उपायामुळे त्यांना चांगला व्यवसाय मिळत असल्याचं लक्षात आलं. पहिल्याच महिन्यात त्यांना 75 हजार रुपयांचं कमिशन मिळालं. सुचली कल्पना जे नागरिक विमा घ्यायला नकार देतात, त्यांना सेक्स सर्व्हिस दिली, तर ते विमा काढतात, असा अनुभव आल्यानंतर या दोघींनी आणखी पाच जणांना हाताशी धरून योजना आखली. या योजनेद्वारे शिक्षणासाठी परराज्यातून आलेल्या मुलींना त्यांनी पगारावर कामाला ठेऊन घेतलं. अगोदर या मुली फोनवरून ग्राहकांशी संपर्क साधायच्या. त्यानंतर त्यांच्याशी ओळख वाढवून भेट मागायच्या. हळूहळू त्यांना सेक्सच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून मोठ्या रकमेचा विमा उतरवून घ्यायच्या. या कामासाठी त्यांनी काही मुली आणि व्यवहार करण्यासाठी एका मुलाला पगारावर नेमलं होतं. हे वाचा- बाबर आझमची GF असल्याचा तरुणीचा दावा,‘कुराण’वर हात ठेवत म्हणाली-त्याने 10 वर्ष… पोलिसांनी फोडलं बिंग पोलिसांना शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. रॅकेट चालवणाऱ्या या महिला उच्चभ्रू सोसायटीत श्रीमंती थाटात राहत असत. शेजाऱ्यांना किंवा पोलिसांना संशय येऊ नये, याची त्या पुरेपूर काळजी घेत असत. मात्र पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर या टोळक्यातील दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी घडाघडा सगळी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी  या प्रकरणी इंदू सिद्धार्थ, सिविल लाइंस थाना प्रभारी रवीन्द्र प्रताप सिंह, मझोला थाना प्रभारी जीत सिंह, प्रदीप कुमार, उज्ज्वल राणा, कॉंन्स्टेबल निखिल, विशाल रावत, अन्नू तोमर, सविता, देवेंद्र सिंह, आकाश शर्मा, महिला कांस्टेबल नीरज कुमारी व रजनी यांना अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या