बस्ती, 2 सप्टेंबर : बस्ती जिल्ह्यातील ओपेक कॅली रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये बुधवारी रात्री 24 वर्षे जुना मानवी सांगाडा सापडल्याने गोंधळ उडाला आहे. 24 वर्षांपूर्वी बंद झालेली लिफ्ट उघडल्यानंतर मानवी सांगांडा सापडला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून याचा तपास सुरू आहे. रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये बुधवारी रात्री 24 वर्षे जुना मानवी सांगाडा मिळाल्यामुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे. 1997 मध्ये लिफ्ट झाली होती बंद मानवी सांगाडा 24 वर्षे जुना असल्याचं सांगितलं जात आहे. 1991 मध्ये बस्तीमध्ये 500 बेड्स असलेले ओपेक कॅली रुग्णालय सुरू करण्यात आलं होतं. मात्र अद्यापही या सर्व इमारती कार्यदायी संस्थेने रुग्णालय प्रबंधनला हँड ओव्हर केलेल्या नाहीत. पोलिसांनी सांगितलं की, 1997 पर्यंत लिफ्ट सुरू होती. त्यानंतर मात्र लिफ्ट खराब झाल्याने 1997 मध्ये बंद पडली. 24 वर्षांनंतर जेव्हा लिफ्टची डागडुजी करण्यासाठी उघडण्यात आलं तर तेथे एक मानवी सांगाडा सापडला. हे ही वाचा- डबल मर्डरने उडाली खळबळ, मित्रांसोबत गेलेल्या दोन तरुणांचा खून बेपत्ता तक्रारीचा पोलिसांकडून शोध पोलिसांनी मानवी सांगाड्याचं गूढ उलगडण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात 24 वर्षे जुने बेपत्ता झाल्याच्या तक्रारी शोध आहेत. डीएनए चाचण्याच्या साहाय्याने बेपत्ता व्यक्तीचा डीएनए त्याच्या नातेवाईकांच्या डीएनएशी मॅच केला जाईल. अद्यापही या मृत्यूचं गूढ कायम आहे. डीएनए रिपोर्ट आल्यानंतरच अधिक खुलासा होईल.