नवी दिल्ली, 15 डिसेंबर : देशाची राजधानी दिल्लीत मुली किती असुरक्षित आहेत याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. पश्चिम दिल्लीतील उत्तम नगर येथे काल (दि.15) सकाळी घरातून शाळेत जाण्यासाठी निघालेल्या 17 वर्षीय मुलीवर अॅसिड फेकण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी तरुणीला गंभीर जखमी केले. या घटनेत त्या चेहरा गंभीररित्या भाजला असून तीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुलगी शाळेत जात असताना तिची लहान बहीणही तिच्यासोबत. याबाबत तिने अॅसिड हल्ल्याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. लहान बहिणीने म्हणाली की, तिच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला होताच, तिच्या बहिणीने आरडाओरडा केला आणि तिला ताबडतोब वडिलांना फोन करण्यास सांगितले.
हे ही वाचा : भानामतीच्या नादात स्वतःच्या मुलीची हत्याकरून मृतदेह पुरला किचनमध्ये, औरंगाबादमधील धक्कादायक घटना
पीडितेच्या लहान बहिणीने या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे याबाबत ती म्हणाली की, दोघीही शाळेत जात असताना आरोपी दुचाकीवरून आले आणि त्यांनी तिच्या बहिणीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. ती जोरात ओरडली आणि वडिलांना बोलवायला सांगू लागली. लहान बहिणीने सांगितले की तिने दोन्ही आरोपींना ओळखले आहे. या घटनेत मुलीचा चेहरा आठ टक्के भाजला असून तिच्या डोळ्यांवरही परिणाम झाला आहे. दरम्यान तातडीने मुलीला सफदरजंग हॉस्पिटलच्या बर्न आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.
सध्या पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात मुख्य आरोपी सचिन अरोरा आणि त्याचे दोन मित्र हर्षित अग्रवाल (19) आणि वीरेंद्र सिंग (22) या तिघांना अटक केली आहे. विशेष पोलिस आयुक्त सागरप्रीत हुड्डा म्हणाले की, हल्ल्यात वापरलेले अॅसिड ऑनलाइन पोर्टलवरून खरेदी केले होते आणि अरोरा यांनी ई-वॉलेटद्वारे पैसे दिले होते. तांत्रिक पुराव्याच्या आधारे हे अॅसिड ‘फ्लिपकार्ट’वरून विकत घेतल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात ई-कॉमर्स पोर्टलकडून कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.
हे ही वाचा : ….अन् मृतदेहाने धर्म बदलला, बुलडाण्यातील घटना, नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन अरोरा आणि पीडितेमध्ये सप्टेंबरपासून मैत्री होती. मात्र, दोघांमध्ये काही काळ दुरावा निर्माण झाला आणि मुलगीने त्याच्याशी बोलण्याचे बंद केले. त्यामुळे अरोराने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. मात्र, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, ही घटना उत्तम नगर येथील मोहन गार्डन परिसरातील आहे.