JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / सहारा इंडिया कंपनीने लाखो लोकांना लावला चुना, काय आहे प्रकरण जाणून घ्या?

सहारा इंडिया कंपनीने लाखो लोकांना लावला चुना, काय आहे प्रकरण जाणून घ्या?

बिहारमध्ये सहारा इंडिया कंपनी विरोधात आवाज उठवला जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

संतोष कुमार गुप्ता (छपरा) 16 मार्च : बिहारमध्ये सहारा इंडिया कंपनी विरोधात आवाज उठवला जात आहे.  सहारा कंपनीने लोकांचे पैसे न दिल्याने संतप्त नागरिकांनी हाताला काळी पट्टी बांधून पालिका चौकात उपोषण केले. यावेळी लोकांनी पैसे न दिल्यास आत्महत्या करू असा इशाराही दिला. लोकांनी आत्महत्या केल्यास सर्वस्वी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असले असा इशाराही आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.

या वेळी आंदोलकांनी असेही सांगितले की, लाखो-करोडो रुपये लोकांनी विश्वासाने सहारा इंडिया कंपनीला पैसा दिला. काहींनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा स्वत:चे घर बांधण्याच्या विचारातून पैसे गोळा केलेले सहारा इंडियाला दिले होते परंतु सहाराने आमचे पैसे बुडवल्याचे लोकांनी सांगितलं. यामुळे लोकांची मानसिकता बिघडत चालली आहे.

संतापजनक! त्याला सोडू नका, फाशी द्या; चिठ्ठी लिहून कोल्हापुरात तरुणीनं संपवलं आयुष्य

संबंधित बातम्या

सहारा इंडिया संस्थेत सहभागी होऊन लोक काही विश्वासाने पैसे जमा करायचे. मात्र पैसे न मिळाल्याने आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. लोकांनी आत्महत्या केल्या आहेत आणि ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

आज छपरा येथे शेकडो लोकांनी नगरपालिका चौकात उपोषण केले असून पैसे न मिळाल्यास आत्महत्या देखील करणार असल्याचे लोकांनी सांगितले. लोकांनी सांगितले की, आपल्या कष्टाच्या मजुरीतील प्रत्येक रुपयाची भर घालून लोकांनी तो विश्वासाने जमा केला. पण त्या सर्व विचारांवर पाणी गेल्याचे दिसत आहे. याबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
पैशाच्या वसुलीसाठी सावकाराचे शेतकऱ्यासोबत धक्कादायक कृत्य, घराबाहेर बोलवलं अन्.., बीडमध्ये खळबळ

त्याचवेळी लोकं आंदोलन करून आत्महत्या करत असल्याबद्दल बोलत आहेत. आता जनतेचे पैसे परत मिळावेत यासाठी सरकार यावर किती गांभीर्याने काम करते हे पाहावे लागेल. जर पैसे परत मिळाले तर लोक त्या पैशातून आपली नियोजित कामे पूर्ण करतील आणि आपल्या कुटुंबासह आनंदी जीवन जगू शकतील.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या