JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सप्तपदी झाल्या, एकमेकांना वचन दिलं; मात्र पाठवणीवेळी नवरीने सासरी जाण्यास दिला नकार

सप्तपदी झाल्या, एकमेकांना वचन दिलं; मात्र पाठवणीवेळी नवरीने सासरी जाण्यास दिला नकार

नवरीच्या एका निर्णयामुळे तरुणाची स्वप्न बेचिराख झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 10 जून : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) गोरखपूर जिल्ह्यातून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे नाचत-वाजवत आलेली वरात जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेली. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर नवरीने सासरी जाणाऱ्या नकार दिला होता. लग्न झाल्यानंतर नवरीने सांगितलं की, तिला नवरदेव पसंत नाही. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. मात्र काहीच होऊ शकलं नाही. यानंतर दोन्ही पक्षांनी आपआपल्या वाट्याचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, खजनी भागातील एका गावात बुधवारी लग्न होतं. मुलीच्या वडिलांनी वऱ्हाड्यांचं स्वागत केलं. वऱ्हाडीदेखील खूप नाचले अन् जेवण केलं. नवरा-नवरीमध्ये जयमालाचा विधीदेखील झाला. गुरुवारी सकाळी चार वाजता सर्व विधी पार पडले. अगदी सप्तपदीही झाल्या आणि यात दोघांनी आजीवन एकत्र राहण्याचं वचन घेतलं. घेणं-देणंही झालं. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर नवरीच्या पाठवणीचा विधी सुरू झाला. यादरम्यान नवरीने सासरी जाण्यास नकार (bride refused to go to her husbands home) दिला. नवरीने सांगितलं की, तिला नवरदेव पसंत नाही. यानंतर दोन्ही पक्षात वादावादी झाली. या प्रकरणात पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं. मात्र तरीही काही होऊ शकलं नाही आणि नवरदेवाची स्वप्नचं उद्ध्वस्त झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या